Indian Woman Detained Shanghai 18 Hours Saam Tv
देश विदेश

Shocking: 'तू भारतीय नाही तर चिनी आहेस...', शांघाय विमानतळावर महिलेचा १८ तास छळ

Indian Woman Detained Shanghai 18 Hours: एका भारतीय महिलेसोबत चीनच्या शांघाय एअरपोर्टवर भयंकर घटना घडली. अरुणाचलच्या या महिलेला तू भारतीय नाही तर चिनी असल्याचे सांगत तिचा छळ करण्यात आला.

Priya More

Summary -

  • अरुणाचलमधील भारतीय महिलेचा शांघायमध्ये १८ तास छळ

  • चिनी अधिकाऱ्यांनी तिचा पासपोर्ट अवैध म्हणत चुकीची वागणूक दिली

  • तू भारतीय नाही, चिनी आहेस!' असे म्हणत हसले

  • भारतीय दुतावासाच्या हस्तक्षेपानंतर महिलेची सुटका

अरुणाचल प्रदेशमधील एका भारतीय महिला नागरिकाला शांघाय विमानतळावर तब्बल १८ तास चौकीशीला सामोरे जावे लागले. चिनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या महिला प्रवाशाच्या जन्मस्थळावरून तिचा पासपोर्ट अवैध असल्याचे सांगितले. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या भारतीय महिलेला अरुणाचल प्रदेश भारताचा भाग नसून चीनचा भाग असल्याचे सांगण्यात आले. शेवटी भारतीय दुतावासाने हस्तक्षेप करत हा प्रश्न सोडवला. सध्या याची जोरदार चर्चा होत आहे.

शांघाय विमानतळावर ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिक प्रेमा वांगजोग थोंगडोक यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. ही महिला भारतीय नागरिक आहे. गेल्या १४ वर्षांपासून ती ब्रिटनमध्ये राहते. लंडनच्या गॅटविकवरून जपानच्या शांघायमध्ये प्रवास करत असताना ही घटना घडली. या महिलेला तिच्या पासपोर्टमध्ये तिचे जन्मस्थान अरुणाचल प्रदेश दाखवले म्हणून थांबवण्यात आले. अरुणाचल हा चीनचा भाग आहे. तुमचा पासपोर्ट वैध नाही, असे म्हणत तिला थांबवण्यात आले. तब्बल १८ तास तिचा छळ करण्यात आला.

या महिलेने तिच्यासोबत नेमकं काय घडलं हा अनुभव एएनआयला सांगितला. ती म्हणाली. 'मी माझ्या पुढच्या फ्लाइटसाठी रागेत उभी राहून ई-गेट्समधून पुढे गेली होती. मग चिनी इमिग्रेशनमधील एक महिला अधिकारी आली आणि तिने मला बाहेर काढले. मी विचारले की काय झाले तर तिने मला जास्त काही सांगितले नाही. फक्त मागे येण्यास सांगितले. ती म्हणाली की, अरुणाचल भारतात नाही तर चीनमध्ये आहे. तुझा व्हिसा स्वीकार्य नाही. तुझा पासपोर्ट अवैध आहे. तिने मला तुम्ही भारतीय नसून चिनी आहात. चिनी पासपोर्टसाठी अर्ज करावा असे सांगितले आणि माझी थट्टा करायला सुरूवात केली आणि हसू लागली.'

या महिलेने पुढे सांगितले की, ती यापूर्वी शांघायमधून कोणत्याही समस्येशिवाय प्रवास करत होती. पण यावेळी आलेला अनुभव हा अपमानास्पद आहे. विमानतळावरील विमान कंपनीचे कर्मचारी मला हसत होते आणि माझ्या पासपोर्टकडे बोट दाखवत होते. त्याठिकाणी गुगल आणि व्हॉट्सअपसारखे सोशल प्लॅटफॉर्म काम करत नसल्यामुळे मला कुणाचीही मदत घेता येत नव्हती. अखेर भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क करत त्यांची मदत घेतली आणि त्यांनी माझी समस्या सोडवण्यास मदत केली. शेवटी रात्री १०.३० वाजता मी विमानतळावरून बाहेर पडले.'

प्रेमा वांगजोग थोंगडोक यांनी असेही सांगितले की, 'आम्ही भारताचा भाग आहोत. आम्ही 'शुद्ध हिंदी' बोलतो. आम्हाला चिनी भाषा समजत नाही. आम्ही सर्व भारतीय आहोत. मला ही जाणीव करून द्यायची आहे की भारताच्या ईशान्येकडील रहिवाशांना अशा छळाला सामोरे जावे लागू नये कारण त्यांना बोलावले जात आहे आणि सांगितले जात आहे की तुम्ही ज्या देशाचे नागरिक आहात त्या देशाचा भाग नाही आहात. मी फक्त भारत सरकारला विनंती करते की अशा बाबींवर चिनी अधिकाऱ्यांवर आणि सरकारवर कठोर कारवाई करावी.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Maharashtra Politics: अजित पवारांनी मोठा डाव टाकला; एकाच दिवशी भाजप आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

Mumbai Travel : 2025 ला निरोप अन् नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत, मुंबईकरांनो न्यू इयरला 'या' ठिकाणी नक्की जा

SCROLL FOR NEXT