India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?

India-UK Free Trade Deal: भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार झाला. हा करार झाल्यामुळे अनेक वस्तूंवरील कर रद्द केला जाणार आहे. त्यामुळे काय स्वस्त आणि काय महाग होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत....
India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?
India-UK Trade Dealsaam tv
Published On

Summary -

  • भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे शेतकरी, मच्छीमार, IT व्यावसायिकांना फायदा होणार

  • स्कॉच व्हिस्की, इलेक्ट्रिक वाहन, सौंदर्यप्रसाधने भारतात स्वस्त होणार

  • ६० हजार आयटी व्यावसायिकांसाठी ब्रिटनमध्ये कामाची संधी

  • फळे, भाज्या, मसाले, कापड यांची निर्यात वाढणार

भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान हा करार झाला होता. जिथे त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांची भेट घेतली होती. गेल्या ३ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये मुक्त करारावर वाटाघाटी सुरू होत्या. आता त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या अंमलबजावणीमुळे दोन्ही देशांमध्ये दरवर्षी सुमारे ३४ अरब डॉलरचा अतिरिक्त व्यापार होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. भारत आणि ब्रिटनमधील नवीन व्यापार करारामुळे अनेक क्षेत्रांना मोठे फायदे होणार आहेत. या करारानंतर अनेक वस्तूंवरील कर रद्द केला जाईल किंवा मोठ्याप्रमाणात कमी केला जाईल. त्यामुळे भारतातून ब्रिटनला होणारी निर्यात वेगाने वाढेल. या करारामुळे भारतामध्ये काय स्वस्त आणि काय महाग होणार हे आपण जाणून घेणार आहोत...

या करारामुळे नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाला चालना मिळेल. भारतीय व्यावसायिक आता पुढील दोन वर्षांसाठी कोणत्याही पदाशिवाय यूकेमध्ये ३५ क्षेत्रांमध्ये काम करू शकतील. या निर्णयामुळे दरवर्षी ६०,००० पेक्षा अधिक आयटी व्यावसायिकांना फायदा होईल. या करारामुळे भारतातील शेतकरी, मच्छीमार, लघु व्यवसाय, स्टार्टअप्स, व्यावसायिक आणि मोठ्या उद्योगांसाठी नवीन संधी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ निर्माण झाली आहे.

कृषी क्षेत्र -

भारतातील अनेक फळे, भाज्या, धान्ये, हळद, काळी मिरी, वेलची, आंब्याचा गर, लोणचे आणि डाळी ब्रिटनमध्ये शुल्काशिवाय जाऊ शकतील. ९५ टक्क्यांपेक्षा जास्त कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नावर आता शून्य टक्के शुल्क असेल. यामुळे, पुढील ३ वर्षांत भारताची कृषी निर्यात २० टक्क्याने वाढण्याची अपेक्षा आहे. २०३० पर्यंत ती १०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतकेच नाही तर निर्यातीसाठी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोपी होईल. यामुळे वेळ आणि खर्च वाचेल. फणस, बाजरी, सेंद्रिय औषधी वनस्पती यासारखी नवीन पिके देखील आता ब्रिटनच्या मार्केटमध्ये जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन उत्पन्न मिळवण्याची संधी मिळेल. मत्स्यपालन करणारी राज्ये आंध्र प्रदेश, ओडिशा, केरळ, तामिळनाडू यांनाही ब्रिटनच्या बाजारपेठेचा फायदा होईल. भारताने दुग्धजन्य पदार्थ, सफरचंद, ओट्स आणि तेलांवर कोणतीही सवलत दिलेली नाही.

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून कमवा ४.५० लाख रुपये

सागरी उत्पादन -

या करारामुळे भारतामधील कोळंबी, टूना मासे, फिशमील आणि इतर सागरी उत्पादनांवरील ४.२ टक्के-८.५ टक्के कर आता रद्द केला जाईल. यामुळे मच्छिमारांना चांगले भाव मिळतील आणि निर्यात वाढेल ज्यामुळे उत्पन्न वाढेल. ब्रिटनच्या ५.४ अब्ज डॉलर्सच्या सागरी बाजारपेठेत भारताचा वाटा फक्त २.२५ टक्के इतका आहे आता त्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.

कॉफी, चहा, मसाले -

ब्रिटन आधीच भारताकडून कॉफी (१.७ टक्के), चहा (५.६ टक्के), मसाले (२.९ टक्के) खरेदी करतो. आता शुल्कमुक्त प्रवेशासह त्यांची निर्यात आणखी वाढेल. विशेषतः इन्स्टंट कॉफीसाठी भारताला मोठा फायदा होईल आणि तो युरोपच्या मोठ्या पुरवठादारांशी स्पर्धा करेल. कमी कर आणि सोप्या प्रक्रियांमुळे भारताची तेलबियांची निर्यात वाढेल.

कापड -

आता ० टक्के शुल्कासह १,१४३ उत्पादन श्रेणी निर्यात करण्याची संधी आहे. पूर्वी बांगलादेश आणि पाकिस्तानसारख्या देशांना याचा फायदा मिळत होता. आता भारतही त्याच्या बरोबरीने आला आहे. रेडीमेड कपडे, होम टेक्सटाईल, कार्पेट आणि हस्तकला यांना थेट फायदा होईल. १-२ वर्षांत ब्रिटनमध्ये भारताचा वाटा ५ टक्क्यापर्यंत वाढू शकतो.

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?
Ladki Bahin Yojana: ₹१५०० कायमचे बंद, राज्यातील १० लाख लाडकीचे अर्ज बाद, यादीत तुमचेही नाव नाही ना?

इलेक्ट्रिक वस्तू -

पूर्वी इलेक्ट्रिक मशिनरी, ऑटो पार्ट्स, औद्योगिक मशिनरींवर १८ टक्के शुल्क होते आता तेही रद्द करण्यात आले आहे. पुढील ५ वर्षांत इलेक्ट्रिक वस्तू निर्यात दुप्पट होऊन ७.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.

इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर -

आता स्मार्टफोन, ऑप्टिकल फायबर, इन्व्हर्टर सारख्या वस्तूंवर शुल्कमुक्त प्रवेश मिळाला आहे. सॉफ्टवेअर आणि आयटी सेवांमध्येही नवीन संधी आहे. दरवर्षी १५२० टक्के वाढ अपेक्षित.

औषधे आणि वैद्यकीय उपकरणे -

भारतातील जेनेरिक औषधे आता ब्रिटनमध्ये स्वस्त झाली आहेत. ज्यामुळे निर्यात वाढण्याची अपेक्षा आहे. शस्त्रक्रिया उपकरणे, एक्स-रे मशीन, ईसीजी मशीन यासारख्या उपकरणांवर कोणतेही शुल्क नाही.

रसायने आणि प्लास्टिक -

रसायनांच्या निर्यातीत ३०-४० टक्के वाढ होऊ शकते. पाईप्स, पॅकेजिंग, स्वयंपाकघरातील वस्तू यासारख्या प्लास्टिक उत्पादनांवरील कर देखील रद्द करण्यात आला आहे. ज्यामुळे १५ टक्के वाढ अपेक्षित आहे.

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?
Ladki Bahin Yojana: लाडकीला रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट मिळणार, खात्यात ₹१५०० जमा होणार

क्रीडासाहित्य आणि खेळणी -

फुटबॉल, क्रिकेट उपकरणे, रग्बी बॉल आणि खेळण्यांवरील कर देखील रद्द करण्यात आला आहे. यामुळे भारत, चीन आणि व्हिएतनामवर फायदा होईल.

जेम्स आणि दागिने -

सध्या भारत ब्रिटनला जेम्स आणि दागिने ९४१ दशलक्ष निर्यात करतो. जो पुढच्या २३ वर्षांत दुप्पट होऊ शकतो.

लेदर आणि फूटवेअर-

लेदर आणि फुटवेअरवरील १६ टक्के ड्युटी रद्द करण्यात आली आहे. आता भारतीय शूज आणि लेदर उत्पादने स्वस्त होतील आणि ब्रिटनच्या बाजारपेठेत मागणी वाढू शकते. यामुळे आग्रा, कानपूर, कोल्हापूर, चेन्नई सारख्या शहरांना थेट फायदा होईल. तसंच, प्रकल्प तज्ज्ञ, योग प्रशिक्षक, स्वयंपाकी, संगीतकार यासारख्या भारतीय व्यावसायिकांना यूकेमध्ये काम करणे सोपे होईल.

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?
Ayushman Bharat Yojana : तब्बल ५ लाखापर्यंत मोफत उपचार; पण अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर!

व्यावसायिकांना सुवर्णसंधी -

या करारामुळे नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाला चालना मिळेल. भारतीय व्यावसायिक आता दोन वर्षांसाठी कोणत्याही पदाशिवाय यूकेमध्ये ३५ क्षेत्रांमध्ये काम करू शकतील. या निर्णयामुळे दरवर्षी ६०,००० हून अधिक आयटी व्यावसायिकांना फायदा होईल. या एफटीएमुळे भारतातील शेतकरी, मच्छीमार, लघु व्यवसाय, स्टार्टअप्स, व्यावसायिक आणि मोठ्या उद्योगांसाठी नवीन संधी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ निर्माण झाली आहे.

ब्रिटिश ब्रँड स्वस्त मिळतील -

भारतात या ब्रिटिश वस्तू स्वस्त होतील भारताने ब्रिटनमधून येणाऱ्या जवळपास ९० टक्के वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आता अनेक ब्रिटिश उत्पादने भारतात पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होतील.एकूणच ब्रिटनमधून येणाऱ्या वस्तूंवरील सरासरी कर १५ टक्क्यावरून फक्त ३ टक्केपर्यंत कमी केला जाईल. यामुळे भारतीय ग्राहकांना स्वस्त किमतीत प्रीमियम ब्रिटिश ब्रँड मिळू शकतील.

इलेक्ट्रिक वाहनं -

स्कॉच व्हिस्की वरील सध्याचे १५० टक्के आयात शुल्क ७५ पर्यंत कमी केले जाईल आणि पुढील १० वर्षांत ते ४० टक्क्यापर्यंत कमी केले जाईल. इलेक्ट्रिक वाहनांवरील कर ११० टक्क्यावरून फक्त १० टक्केपर्यंत कमी केला जाईल. सौंदर्यप्रसाधने, चॉकलेट, बिस्किटे, सॅल्मन मच्छी, सॉफ्ट ड्रिंक्स आणि वैद्यकीय उपकरणे या सर्व गोष्टी आता भारतात स्वस्त होतील.

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?
Schemes: भारताप्रमाणे या देशांमध्येही चालते आयुष्मान भारत योजना; फरक काय? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com