नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. भारतीय रेल्वेने वंदे भारत या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एअर कर्टन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाने प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. यामुळे ट्रेनच्या सुंदरतेमध्ये भर पडणार आहे.
भारतीय रेल्वेने या आधी नवी दिल्ली- खजुराहो मार्गावर एअर कर्टन लावले होते. आता जम्मू-श्रीनगर भागातही प्रमुख ट्रेनमध्ये एअर कर्टन लावण्यास सुरुवात केली जाणार आहे. रेल्वेच्या निर्णयाने प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. रेल्वेच्या निर्णयाने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
भारतीय रेल्वे सध्या देशातील विविध भागातून काश्मीरपर्यंत ट्रेन चालवण्यासाठी प्रयत्न करत आहे. एकीकडे रेल्वे जम्मू-काश्मीर भागात ट्रेनमध्ये गरम डबा चालू करण्याचा विचार सुरु आहे. सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२५ साली रेल्वेसाठी २.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या अर्थसंकल्पातील तुलनेसारखी तरतूद यंदा केली आहे.
भारतीय रेल्वे वर्षाला ४००० किलोमीटर नेटवर्क जोडण्यात महत्वाची भूमिका निभावत आहे. भारतीय रेल्वेने मागील १० वर्षात ३१,१८० किलोमीटर नवीन ट्रॅक टाकले आहेत. रेल्वेच्या या कामामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
जम्मू काश्मीरच्या कत्रा या भागात वैष्णवदेवीचं मंदिर आहे. या वैष्णवदेवीवर देशभरातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. ही बाब लक्षात घेत रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली ते कत्रा येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये १०० टक्के शाकाहारी अन्न देण्याचा निर्णय घेतलाय. वैष्णवीदेवीच्या मंदिराची भेट घेण्यासाठी दरवर्षी लाखो लोक जातात. देशातील विधिध राज्यात लोक देवीच्या दर्शनासाठी येतात. वैष्णदेवी मंदिराला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस हा उत्तम पर्याय असल्याचं बोललं जातं. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.