Railway Station saam tv
देश विदेश

Railway Rule: 15 रुपयांचा पाण्याची बाटली 20 रुपयांना; प्रवाशांना लुटणाऱ्या विक्रेत्यांची या नंबरवर करा तक्रार

रेल्वे स्थानकावरील अनेक दुकानदार लोकांकडून जास्त पैसे घेतात.

साम टिव्ही ब्युरो

Indian Railway: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेने प्रवास अत्यंत स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो. प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेकडून प्लॅटफॉर्मवरच खाण्यापिण्याच्या स्टॉलची व्यवस्था केली आहे.येथील दुकानदार 15 रुपयांची बाटली 20 रुपयांना विकताना तुम्ही देखील पाहिलं असेल.

अशावेळी बहुतेक लोक त्यांच्या मजबुरीमुळे जास्तीचे पैसे देऊन टाकतात. मात्र दुकानदार तुमच्याकडून जास्त पैसे मागत असल्यास तुम्ही त्याबाबततची तक्रार करु शकता. प्रवाशांची लूट थांबण्यासाठी रेल्वेना काही नंबर जारी केले आहेत.

ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर ओव्हरचार्जिंग केले जाते हे तुम्ही अनुभवलं असेल. पाण्याच्या बाटली असो किंवा जेवण, रेल्वे स्थानकावरील अनेक दुकानदार लोकांकडून जास्त पैसे घेतात. अशा वेळी थोडी काळजी घेतली तर अशा प्रकारची आर्थिक लूट थांबवता येऊ शकते. (Latest News)

जर तुमच्यासोबक किंवा तुमच्या समोर असे घडत असेल तर तुम्ही 1800111139 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा. याशिवाय अनेक लोक तक्रार करण्यासाठी तक्रार पुस्तिका मागतात, तेव्हा रेल्वे कर्मचारी ते देण्यास नकार देतात. त्यामुळे तुम्ही या क्रमांकावर त्वरित तक्रार नोंदवू शकता.

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एसएमएसचा पर्यायही उपलब्ध करून देते. यासाठी प्रवाशाने 9711111139 या क्रमांकावर मेसेज करावा. याशिवाय तुम्ही या क्रमांकावर रेल्वेला सूचनाही देऊ शकता.

रेल्वे स्टेशनवर जे दुकानदार तुमच्याकडून जास्त पैसे घेतात. तुम्ही त्यांच्याविरुद्ध ऑनलाइन तक्रारही दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला रेल्वेची तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS) वापरावी लागेल. येथे तुम्ही File a Complaint या पर्यायावर क्लिक करून तक्रार दाखल करू शकता. येथे तुम्हाला तक्रार क्रमांक मिळेल. ज्याचा वापर करून तुम्हाला त्याचं स्टेचस देखील कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महापालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी मृत्यूप्रकरणी उद्या नगर बंदची हाक

श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियात दिग्गज क्रिकेटपटूची एंट्री; साई सुदर्शन संघातून का झाला आऊट?

मुंबईत मोठी कारवाई; ४४ बांगलादेशी नागरिकांच्या आवळल्या मुसक्या

Fitness Tips : पन्नाशीनंतरही हाडे राहतील लोखंडासारखी मजबूत; डॉक्टरांचा 'हा' सिक्रेट फॉर्म्युला पाहा

Mosquito Bites : डास शोधून शोधून तुम्हालाच का चावतात? समोर आले धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT