Shiv Thakare: घरोघरी दूध, पेपर विकले; चाळीतलं घर ते बिग बॉसचं घर... शिव ठाकरेचा प्रेरणादायी प्रवास

साधेपणा आणि अनोख्या शैलीमुळे शिव ठाकरे चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
Shiv Thakare
Shiv Thakare Saam Tv

Shiv Thakare : 'बिग बॉस 16'चा आज ग्रँड फिनाले आहे. बिग बॉसच्या विजेत्याची घोषणा आज होणार आहे. शेवटच्या दिवसापर्यंत घरात टिकून राहिलेल्यांमध्ये प्रियांका, शालीन, अर्चना, स्टॅन आणि शिव ठाकरे यांच्या नावांचा समावेश आहे. या शोचा फायनलिस्ट मराठमोळ्या शिव ठाकरे याने लोकांची मने जिंकली आहेत.

साधेपणा आणि अनोख्या शैलीमुळे शिव ठाकरे चाहत्यांच्या पसंतीस उतरला. आज शिव ठाकरे इथपर्यं पोहोचला ते सहज शक्य झालं नाही. यासाठी त्याला खूप मेहनतही घ्यावी लागली आहे. साध्या चाळीतलं घर ते बिग बॉसचं घरं असा त्याचा प्रवास आहे. याआधी त्याने बहिणीसोबत दूध आणि वर्तमानपत्र देखील विकली आहेत.

Shiv Thakare
कव्वालीपासून ते एक रॅपर... MC Stanची डाऊन टू अर्थ स्टोरी, आता आहे कोट्यावधीचा मालक

घरची गरीब परिस्थिती पाहून शिवने डान्स क्लास सुरू केले. तेथून हळूहळू त्याला चांगली कमाई होऊ लागली. शिव ठाकरे पहिल्यांदाच रोडीजमध्ये दिसला होता. रणविजयपासून ते करण कुंद्रा यांनी शिव ठाकरेंचं कौतुक केलं होतं.

रोडीजनंतर, शिव ठाकरे मराठी बिग बॉसमध्ये सामील झाला आणि तो त्या शोचा विजेता ठरला होता. त्यानंतर मराठी टेलि इंडस्ट्रीत शिवने आपली ओळख निर्माण केली. शिव ठाकरे शो, कोरिओग्राफी आणि रिअॅलिटी शोजमधून भरपूर कमाई करतो.

Shiv Thakare
Archana Gautam: अर्चनाचा 'तो' व्हिडिओ होतोय आजही तुफान व्हायरल, यापूर्वीही रिअॅलिटी शोमध्ये घेतला होता सहभाग

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरे यांची एकूण संपत्ती 10 कोटी रुपये आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ठाकरे अनेकदा त्यांच्या डान्सचे व्हिडिओ आणि वर्कआउट सेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com