Bharat Jadhav
उत्तम आरोग्यासाठी दिवसाची चांगली सुरुवात करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकारात्मक सुरुवात केल्याने दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होते. आरोग्याशी संबंधित विविध समस्यांपासून आराम मिळू शकतो.
दररोज सकाळी पाणी पिणे फायदेशीर असते त्यात रिकाम्या पोटी लिंबू-पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले असते. लिंबूमधील पोषक घटक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतात.
अनेकजण तरुण वयातच विविध आजारांना बळी पडत आहेत. अयोग्य जीवनशैली आणि खाद्यपदार्थांचे व पेयांचे सेवन करण्याची सवय शरीराला घातक शकतात.
उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी आरोग्यदायी सवयी अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे ही अशीच एक सवय आहे. या सवयीचा दैनंदिन दिनचर्येत समावेश केल्यास आरोग्यात लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
'एडिसन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन'च्या मते लिंबू पाण्यामुळे मिळणाऱ्या फायद्यांमुळे ते अनेकांसाठी सकाळचे लोकप्रिय पेय बनले आहे. सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण (हायड्रेशन) संतुलित राखण्यास मदत होत असते. संतुलित आहाराचा एक भाग म्हणून 'व्हिटॅमिन सी' मिळते.
लिंबाच्या रसातील जिवाणूविरोधी गुणधर्म संसर्गाशी लढण्यास मदत करतात.व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, लिंबू हे पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटकांचाही स्रोत आहे.
व्हिटॅमिन 'सी'चा चांगला स्रोत असल्याने, लिंबाचा रस शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्यापासून संरक्षण करतो. रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने सर्दीवर मात करण्यास मदत होते. कोमट पाण्यासोबत लिंबाचा रस घेतल्यास पचन सुधारते आणि चयापचय क्रिया (मेटाबॉलिक रेट) वेगवान होते, ज्यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत मिळते.
लिंबाच्या रसातील जिवाणूविरोधी गुणधर्म संसर्गाशी लढण्यास मदत करतात.व्हिटॅमिन सी यासह लिंबू हे पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम इत्यादींचेही उत्तम स्रोत आहे. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत असल्याने, लिंबाचा रस रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्यापासून शरीराचे रक्षण करतो.