Indian Railway  Saam Digital
देश विदेश

Indian Railway : मध्य रेल्वेची मोठी कारवाई! एका महिन्यात २१ दलालांना अटक, साडे तेरा लाखांची तिकिटंही जप्त

Indian Railway News : मेल-एक्सप्रेसच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या तिकिट दलालांवर मध्य रेल्वेच्या आरपीएफने कडक कारवाई केली आहे. एक महिन्यात तिकिट दलालांविरुद्ध दाखल केलेल्या २७ गुन्ह्यांमध्ये २१ जणांना अटक केली आहे.

Sandeep Gawade

मेल-एक्सप्रेसच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या तिकिट दलालांवर मध्य रेल्वेच्या आरपीएफने कडक कारवाई केली आहे. एक महिन्यात तिकिट दलालांविरुद्ध दाखल केलेल्या २७ गुन्ह्यांमध्ये २१ जणांना अटक केली आहे.तर त्याच्याकडून साडे तेरा लाख रुपयांच्या तिकीट जप्त केली आहे.

उन्हाळी सुट्टीमध्ये गावी,फिरायला जाण्यासाठी किफायतशीर,आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी नागरिक रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात. मेल-एक्सप्रेसचे आरक्षित तिकिट काढण्यासाठी नागरिक सकाळपासूनच आऱक्षण केंद्रावर रांगा लावतात. परंतु आऱक्षण खिडकी उघडताच आऱक्षित तिकिटे संपतात.त्यामुळे प्रवाशांना वेटिंगचे तिकिट घ्यावे लागते. परंतु वेटिंगचे तिकिट कन्फर्म होत नसल्याने प्रवासी आऱक्षित तिकिट मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. प्रवाशांच्या याच अडचणींचा फायदा तिकिट दलाल घेतात.

प्रवाशांना जादा पैसै मोजून आरक्षित तिकिट देतात. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक फसवणूक होते.तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या तिकिट दलालांवर मध्य रेल्वेच्या आरपीएफने कडक कारवाई केली आहे. एप्रिल २०२४ मध्ये आरपीएफ पोलिसांनी रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत दलाली विरूध्द २७ प्रकरणे नोंदवली. या कायद्यांतर्गत एकूण २१ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी ४५२ तिकिटे जप्त करण्यात आली असून त्याची किंमत १३ लाख ५५ हजार १०७ रुपये आहे. या गुन्हेगारांकडून रोख नऊ हजार रुपये जप्त करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water: गोड पाणी असणारा नारळ कसा ओळखायचा? वाचा १ सोपी ट्रिक

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

SCROLL FOR NEXT