Indian origin businessman US 500 million bank fraud case  
देश विदेश

अमेरिकेत सर्वात मोठा घोटाळा, भारतीय वंशाच्या व्यक्तीवर ४००० कोटींच्या लोन फ्रॉडचा आरोप

Bankim Brahmbhatt bankruptcy filing investigation news : अमेरिकेत भारतीय वंशाचे उद्योजक बंकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर तब्बल ४००० कोटींच्या (५०० मिलियन डॉलर) कर्ज घोटाळ्याचा आरोप. बनावट ग्राहक खाती आणि बनावट महसूल दाखवून अमेरिकन बँकांकडून कर्ज उचलल्याचा आरोप.

Namdeo Kumbhar

Indian origin businessman US 500 million bank fraud case : अमेरिकेत भारतीय वंशाच उद्योजक बंकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर ५०० मिलियन डॉलर्सच्या कर्ज घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार बंकिम यांनी बनावट ग्राहक खाती तयार केली आणि बनावट महसूल गोळा करून अमेरिकन बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्जे मिळवली. ब्रह्मभट्ट यांच्या कंपन्यांकडून दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कंपन्याची आता चौकशी आणि तापसणी करण्यात येत आहे. कंपन्या खरेच दिवाळखोरीत आहेत का? याचा तपास घेतला जात आहे. (Bankim Brahmbhatt BridgeVoice & telecom loan scam details)

बंकिम ब्रह्मभट्ट हे भारतीय वंशाचे असून अमेरिकेत त्यांचा टेलीकॉम व्यवसाय आहे. बंकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर ५०० मिलिय डॉलर म्हणजेच ४००० कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने (WSJ) याबाबत रिपोर्ट साजर केला आहे. त्यानुसार, ब्रह्मभट्ट यांनी बनावट ग्राहक बँक खाती तयार केली. त्या खात्याच्या मार्फत त्यांनी बँकाकडून कर्जाने पैसे घेतले.

बंकिम ब्रह्मभट्ट यांच्याकडे अमेरिकेत ब्रॉडबँड टेलिकॉम आणि ब्रिजव्हॉइस नावाच्या कंपन्या आहेत. आपल्याकडे ग्राहक चांगले आहे, त्याशिवाय उत्पन्नही भरघोस असल्याचे बंकिम यांनी आपल्या अनेक गुंतवणूकदारांना सांगून दिशाभूल केल्याचा आरोप आहे. कारण, रिपोर्ट्सनुसार, प्रत्यक्षात बंकिम यांनी बनावट ग्राहक आणि फसव्या व्यवाहारांवर आधारित नफा दाखवलाय. या घोटाळ्यात अमेरिकेतील आघाडीची गुंतवणूक कंपनी एचपीएस इन्व्हेस्टमेंट पार्टनर्स आणि ब्लॅकरॉक कंपनीकडून घेतलेला निधीचाही समावेश आहे.

सप्टेंबर २०२० पासून एचपीएसने ब्रह्मभट्टच्या एका कंपनीला कर्ज देण्यास सुरुवात केली. २०२१ च्या सुरुवातीला ही रक्कम हळूहळू ३८५ दशलक्ष डॉलर आणि ऑगस्ट २०२४ पर्यंत ४३० दशलक्ष डॉलरपर्यंत वाढली. यापैकी जवळजवळ निम्मे कर्ज बीएनपी परिबास बँकेने दिले होते. बंकिम ब्रह्मभट्ट यांच्या कंपनीकडून आता दिवाळखोरीचा अर्ज सादर केला आहे. दरम्यान, बंकिम ब्रह्मभट्ट हे अमेरिका सोडून भारतात परत आल्याचाही काही रिपोर्ट्सनुसार समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT