Fighter Jet Crash Saam tv
देश विदेश

Fighter Jet Crash : लष्कराचं फायटर जेट क्रॅश; अपघातानंतर झाले दोन तुकडे, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Fighter Jet Crash update : लष्कराचं फायटर जेट क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर जेटचे दोन तुकडे झाले. ही संपूर्ण थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Vishal Gangurde

हरियाणाच्या पंचकुलामध्ये मोरनीजवळील बालदवाला गावात फायटर जेट कोसळल्याची घटना घडली आहे. फायटर जेटच्या अपघातामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली. फायटर जेटच्या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर तपासासाी विशेष पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.

फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. विमान कोसळल्यानंतर तुकडे जमिनीवर पसरले. भारतीय हवाई दलाच्या माहितीनुसार, जॅगुअर फायटर जेट विमान नियमित प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं. जेट क्रॅश झाल्यानंतर पायटलला सुरक्षितरित्या बाहेर बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे पायलटचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.

हवाई दलाने दिले चौकशीचे आदेश

हवाई दलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर म्हटलं आहे की, 'भारतीय हवाई दलाचं विमान तांत्रिक कारणामुळे कोसळलं'. विमान का कोसळलं, याची तपास करण्याचे आदेश हवाई दलाने दिले आहेत.

हवाई दलाकडून संपूर्ण घटनेची चौकशी सुरु केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी तपासाचे आदेश दिले आहेत. लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असा सल्ला लोकांना देण्यात आला आहे. जेट क्रॅश कोसळल्यानंतर तपासाच्या रिपोर्टकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हवाई दलाच्या माहितीनुसार, पायलटने सतर्कता दाखवत विमान लोकवस्तीपासून दूर नेलं. यामुळे विमान क्रॅश झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विमान कोसळल्यानंतर आगीने पेट धरला. घटनेची माहिती मिळताच काही जण घटनास्थळी पोहचल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

SCROLL FOR NEXT