Jawhar Police : पुष्पा स्टाईलने बनावट दारूची वाहतूक; जव्हारमध्ये ९ लाख रुपयांचा दारूसाठा पकडला

Palghar News : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याच्या सीमेवर असलेल्या केंद्रशासित प्रदेश दमण- सेलवास येथून पुष्पा स्टाईलने टेम्पोत कप्पे करून लपवुन ठेवलेला दारूसाठा जप्त केला आहे
Jawhar Police
Jawhar PoliceSaam tv
Published On

फैय्याज शेख 
जव्हार (पालघर)
: दुधाच्या कंटेनरमध्ये छंदांच्या लाकडांची तस्करी केली जात असल्याचे पुष्पा चित्रपटात दाखविण्यात आले आहे. त्यानुसार टेम्पोमध्ये छुपे असे कप्पे करून त्यामधून बनावट दारूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. पालघर स्थानिक गुन्हे शाखा व जव्हार पोलिसांनी कारवाई करत बनावट दारूचा साठा जप्त केला आहे. 

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याच्या सीमेवर असलेल्या केंद्रशासित प्रदेश दमण- सेलवास येथून पुष्पा स्टाईलने टेम्पोत कप्पे करून लपवुन ठेवलेला दारूसाठा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पालघर व जव्हार पोलिस यांची संयुक्त कारवाई करत साठा जप्त करण्यात आला. यात दमण बनावटीची अवैध दारूची तस्करी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई जव्हारच्या शिवनेरी ढाबा येथे बुधवारी दुपारी करण्यात आली.

Jawhar Police
Kopargaon News : गोदावरीतून बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाकडून बोटी उद्धवस्त

होळीच्या पार्श्वभूमीवर दारू वाहतूक 

होळीचा सण आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. होळी सणा निम्मित्त सदरचा साठा नाशिक येथे नेला जात होता. केंद्र शासित प्रदेशात मद्यावरील कर अन्य राज्यांपेक्षा ५० टक्के पेक्षा कमी आहे. यामुळे सेलवास वरून सिमावर्ती डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाड्या तालुक्यातील आडरस्त्याने दादरा, नगर हवेली, सेलवासच्या दारूची अवैधरित्या मोठ्या प्रमाणात चोरटी वाहातुक करण्यात येत आहे. सदर टेम्पो दादरा, नगर हवेली, सेल्वास, जव्हारमार्गे नाशिकच्या दिशेने जात होता.  

Jawhar Police
Bribe Case : दोन हजाराची लाच घेणे पडले महागात; पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल, नरडाणा पोलीस स्थानकात खळबळ

९ लाख ७० हजार रुपयांची दारी जप्त 

यावेळी गस्ती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पालघर व जव्हार पोलिसांनी त्याला आडवुन तपासणी केली. यात दारूचा साठा मिळून आला. पाठीमागील फालक्याच्या लेवलला बॉडी असल्याचे फालका (मागील दार) खोलले असता पार्टेशनखाली कप्पे कप्पे करून पुष्पा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अवैध मद्य साठा असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. यात ९ लाख ७० हजाराची दारू व १० लाखाचे आयशर टेम्पो मिळून १९ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com