India Tech Couple Mysteriously Die In US Saam Dightal
देश विदेश

India Tech Couple Mysteriously Die In US: भारतातील टेक दाम्पत्याचा दोन मुलांसह अमेरिकेत गूढ मृत्यू :अंधश्रद्धेचे बळी ठरल्याचा संशय

Tej Pratap Suicide After Killing Wife And Children तेज प्रताप यांनी आधी पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतातील टेक दाम्पत्याचा आणि त्यांच्या दोन मुलांचा गुढरित्या मृत्यू झाला आहे. न्यू जर्सीतील त्यांच्या राहत्या घरी या कुटुंबातील चौघांचेही मृतदेह आढळून आले आहेत. दरम्यान पोलिसांनी खून किंवा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच तांत्रिकाने अशा पद्धतीचे कृत्य करण्यासाठी प्रवृत्त केल्याचाही संशय व्यक्त होत आहे. तेज प्रताप (वय ४४), पत्नी सोनल परिहार (वय 42) आणि त्यांच्या दोन मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे.

उत्तरप्रदेश मधील हे दाम्पत्य २००९ मध्ये न्यू जर्सीत स्थायिक झालं होतं. तेज प्रताप यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक पूर्ण केल्यानंतर त्यांना एचसीएलमध्ये नोकरी मिळाली. नोकरीची ऑफर स्वीकारल्यानंतर ते पत्नी सोनलसह २००९ मध्ये न्यू जर्सीत स्थायिक झाले होते. अशी माहिती तेज प्रताप यांचा भाऊ विवेक यांनी दिली.

न्यू जर्सीतील मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेज प्रताप यांनी आधी पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान या चौघांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी उत्तरप्रदेश मधील त्यांच्या मूळ गावी आणता यावेत, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT