India Vs Pakistan Saam Tv
देश विदेश

India Vs Pakistan: आम्ही भारताची ५ लढाऊ विमाने पाडली, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा बोगस दावा, भारत प्रत्युत्तर देत म्हणाला...

India Vs Pakistan: भारत पाकिस्तानमध्ये तणाव अजूनच वाढत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताची ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. मात्र, भारताने हा दावा फेटाळला आहे.

Siddhi Hande

७ मे रोजी भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. पहलगाम हल्ल्याचा बदला पाकिस्तानने घेतला आहे. पहलगाम हल्ला २२ एप्रिल रोजी झाला होता. त्यात २६ पर्यटक मारले गेले होते. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहे. यानंतर आता पाकिस्तानने भारताचे ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे.

भारताची ५ लढाऊ विमाने पाडली- पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा दावा

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी संसदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मी आपले एअर चीफ जहीर बाबर यांना मी तुमच्याकडून, पाकिस्तनच्या संपूर्ण जनतेकडून सलाम करत आहोत की त्यांनी आणि त्यांच्या टीमने हिंदुस्तानच्या ५ लढाऊ विमानांना पाडले आहे. त्यात ३ राफेलचा समावेश आहे. हिंदुस्थाननेन जेव्हा रात्री पाकिस्तानवर हल्ला केला. पाकिस्तानमधील ६ शहरांना टार्गेट केले तेव्हा पाकिस्तानच्या एअर चीफने हे काम केले आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये ८० विमाने पाठवली होती.यासाठी पाकिस्तानच्या तिन्ही सेना अनेक दिवसांपासून तयारी करत होत्या. ज्यामुळेच पाकिस्तानने भारताची लढाऊ विमाने पाडली, असा दावा त्यांनी केला आहे.

भारताने दावा फेटाळला

पाकिस्तानने भारताचे ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. परंतु भारताने हा दावा फेटाळला आहे. भारताच्या सैन्याने काल पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे तिन्ही सैन्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ticket Booking : रेल्वेचं तिकीट बुक करताना 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा; मिनिटांत होईल कन्फर्म

शाळांना सुट्टी जाहीर! माकडांच्या दहशतीमुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: गेल्या 24 तासापासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस...

CJP आंदोलकांवरील गुन्हे मागे! दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

5 तास ठाण्यातच ठेवले; 73 वर्षीय नागरिकाला ठाण्यातच ब्रेन स्ट्रोक, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT