India Rail in Saudi Arabia Saam TV
देश विदेश

India Rail in Saudi Arabia : सौदी अरेबिया आणि युएईमध्ये धावणार भारतीय रेल्वे, चीनला मोठा दणका

सौदी अरेबिया आणि युएईमध्ये धावणार भारतीय रेल्वे, चीनला मोठा दणका

Satish Kengar

India Rail in Saudi Arabia : सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसह (यूएई) अनेक आखाती देशांमध्ये भारतीय बनावटीच्या रेल्वे लवकरच धावताना दिसू शकतात. या प्रकल्पासंदर्भात अमेरिका, भारत, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये बैठकही झाली आहे.

हे रेल्वे नेटवर्क बंदरांमधून शिपिंग लेनद्वारे देखील भारताशी जोडले जाईल. आखाती देशांमधील वाढत्या चीनचा प्रभाव कमी करणे हा त्याचा प्राथमिक उद्देश, असल्याचं सांगण्यात येत आहे.

बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून चीन मध्यपूर्वेतील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. अशा परिस्थितीत रेल्वे नेटवर्कचा हा संयुक्त पायाभूत सुविधा प्रकल्प लवकरात लवकर अमेरिकेला राबवायचा असल्याचं सांगण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

India Rail in Saudi Arabia : सौदी दौऱ्यावर अमेरिकन अधिकाऱ्यांनी केली चर्चा

एका वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान शनिवारपासून सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी रविवारी सौदी, अमिराती आणि भारतीय समकक्षांची भेट घेऊन प्रकल्प आणि इतर प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली.

यातच रेल्वे नेटवर्क प्रकल्पासह अन्य प्रादेशिक प्रश्नांबाबत गंभीर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुलिवान यांनी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि इतर सौदी अधिकाऱ्यांशी सौदी अरेबिया-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांची स्थिती यावर चर्चा केली आहे.

India Rail in Saudi Arabia : I2U2 फोरममध्ये रेल्वे नेटवर्कवर चर्चा झाली

आखाती देशांमध्ये भारतीय रेल्वे नेटवर्कचा मुद्दा गेल्या १८ महिन्यांत I2U2 नावाच्या मंचावर चर्चेदरम्यान समोर आला. यामध्ये अमेरिका, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती आणि भारत यांचा समावेश आहे.

I2U2 ची स्थापना २०२१ मध्ये मध्यपूर्वेतील धोरणात्मक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी करण्यात आली. एका माजी वरिष्ठ इस्रायली अधिकाऱयाने या मुद्द्यावर सुरुवातीच्या चर्चेत थेट सहभाग घेत अॅक्सिओसला सांगितले की, हा प्रकल्प थेट चीनशी जोडला गेला होता, परंतु कोणीही त्याचे नाव दिले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT