baba vanga  Saam tv
देश विदेश

Pahalgam Attack : पाकिस्तानच्या इस्लामाबादवर भारताचा कब्जा? बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

baba vanga : भारत-पाकिस्तान युद्ध होणार आणि पाकिस्तान बेचिराख होणार अशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केलीय...युद्ध करून भारत इस्लामाबादवर कब्जा मिळवणार असल्याचा दावा केलाय...खरंच बाबा वेंगाने अशी भविष्यवाणी केलीय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होणार...आणि भारत पाकिस्तानातील इस्लामाबादवर कब्जा मिळवणार असल्याची भविष्यवाणी बाबा वेंगाने केलीय...आतापर्यंतच्या बाबा वेंगाच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्यायत...त्यामुळे या दाव्याने आता युद्ध होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीय...बाबा वेंगाने काय भविष्यवाणी केलीय...? मेसेज काय व्हायरल होतोय पाहुयात...

बाबा वेंगाची भविष्यवाणी काय?

'2025 साली भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होणार.भारत जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला पुसून टाकेल. पाकिस्तानला उद्ध्वस्त करून इस्लामाबाद भारत ताब्यात घेईल' हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे खरंच बाबा वेंगाने ही भविष्यवाणी केलीय का...? याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमने प्रयत्न केला...त्याआधी बाबा वेंगाने केलेल्या कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यायत पाहुयात...

बाबा वेंगाच्या खऱ्या ठरलेल्या भविष्यवाणी

दुसरे महायुद्ध

सोव्हिएत युनियनचे विघटन

1997 साली प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू

2004 ची त्सुनामी

अमेरिकेतील 9/11 हल्ला

कोविड-19 महामारी

बाबा वेंगाने या केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यायत...त्यामुळे भारत पाकिस्तान युद्धावर खरंच बाबा वेंगाने भविष्यवाणी केलीय का...? अनेक भाकितं खरी ठरल्याने आता जर बाबा वेंगाने युद्धाचं भाकित केलं असेल तर टेन्शन वाढवणार आहे...मात्र, पाकिस्तानला नेस्तनाबूत करून इस्लामाबादवर कब्जा करणार असेल तर भारतासाठी मोठी गोष्ट आहे...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

भारत पाकिस्तान युद्धाबाबत वेंगाने भविष्यवाणी केलेली नाही

युद्धात पाकिस्तान बेचिराख होण्याचा कुठेही उल्लेख नाही

2025 सालाच्या भविष्यवाणीत युरोपमधील संघर्षाचा उल्लेख

युरोपात संघर्ष आणि मानवी सभ्यतेच्या अंताची सुरुवात असा उल्लेख

सध्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय...भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे संपूर्ण पाकिस्तान भीतीने थरथर कापतोय...त्यातच काहींनी बाबा वेंगाने भविष्यवाणी केल्याचा दावा केला...मात्र, आमच्या पडताळणीत भारत-पाकिस्तान युद्धावर वेंगाने भविष्यवाणी केली नसल्याचं समोर आलं...त्यामुळे हा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT