India-pakistan update saam tv
देश विदेश

भारतानं पुन्हा पाकिस्तानचे कान पिळले; जम्मू-काश्मीर राग आळवल्यानं फटकारलं

नेहमीच जम्मू-काश्मीर राग आळवणाऱ्या पाकिस्तानला यावेळीही भारतानं चांगलंच फटकारलं आहे.

Nandkumar Joshi

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या संसदेत जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकनाच्या (Jammu-Kashmir) मुद्द्यासंबंधी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. नेहमीच जम्मू-काश्मीर राग आळवणाऱ्या पाकिस्तानला यावेळीही भारतानं (India) चांगलंच फटकारलं आहे. पाकिस्तानच्या या कृतीचा भारताकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन पद्धतीवर पाकिस्तानच्या संसदेत मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव स्पष्टपणे अमान्य करत आहोत, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं (Pakistan Parliament) ठणकावून सांगितलं. भारताच्या अंतर्गत प्रकरणात निर्णय घेणे किंवा त्यात हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी सुनावलं.

केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाखचा पूर्ण भाग कायमच भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पुढेही राहील, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता बागची यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले. पाकिस्तान आपल्या देशाचा कारभार सुरळीत चालवण्याऐवजी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे आणि तथ्यहीन आणि भारताच्या विरोधात प्रचार करत आहे ही दुर्दैवी बाब आहे, असंही बागची यांनी म्हटलं आहे. केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमांकन प्रक्रिया ही लोकशाही पद्धत आहे, असंही ते म्हणाले.

याआधी भारतानं जम्मू-काश्मीरमधील सीमांकनाच्या मुद्द्यावर ओआयसीच्या हास्यास्पद टिप्पणीवर सोमवारी कडाडून टीका केली. तसेच सांप्रदायिक अजेंडा चालवण्यापासून दूर राहावे, अशा शब्दांत ओआयसीला ठणकावून सांगितलं. ओआयसीनं जम्मू-काश्मीर सीमांकनाच्या मुद्द्यावरून टीका केल्यानंतर भारतानं कडक शब्दांत सुनावले.

जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी सांगितलं की, ओआयसीनं पुन्हा एकदा भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर हास्यास्पद टिप्पणी केली. हे आश्चर्यकारक आहे. मागच्या वेळीच भारतानं जम्मू-काश्मीरसंबंधी ओआयसीचं मत स्पष्टपणे फेटाळून लावलं होतं, याची आठवणही त्यांनी करून दिली. जम्मू -काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: किळसवाणा प्रकार! तुम्हीही रेल्वेतील सामोसे खाताय? त्याआधी हा व्हिडीओ पाहाच, पायाखालची वाळू सरकेल

Maharashtra News Live Updates: शिवसेना उमेदवार विजय शिवातारेंकडून आचारसंहितेचा भंग

अब्दुल सत्तारांचा प्रताप, शिक्षकांना प्रचाराला पाठवले, निवडणूक आयोगाची थेट कारवाई

Shadashtak Yog: सूर्य-गुरुची अशुभ दृष्टीमुळे ओढावणार 'या' राशींवर संकट; नात्यात टोकाचे वाद होण्याची शक्यता

Bank Job: १५०० रिक्त जागा अन् ८५००० रुपये पगार; यूनियन बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT