DK Shivakumar tops the list of richest Chief Ministers in India, followed by Chandrababu Naidu and Thalapathy Vijay. Saam Tv
देश विदेश

देशातील 4 कोट्याधीश मुख्यमंत्री, कोणत्या राज्याच्या CM पहिल्या क्रमांकावर? थलपती विजयची संपत्ती किती? आकडेवारी आली समोर

List Of Richest Chief Ministers In India 2026 With Assets: देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी समोर आली असून कर्नाटकचे डी.के. शिवकुमार पहिल्या क्रमांकावर आहेत. थलपती विजय, चंद्रबाबू नायडू आणि पेमा खांडू यांच्या संपत्तीची सविस्तर माहिती जाणून घ्या.

Omkar Sonawane

देशातील 31 मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या संपत्तीच्या जवळपासही दूसरा कोणताही मुख्यमंत्री नाही. त्यांनी एकूण 1,413 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तर आकडेवारीनुसार सर्व मुख्यमंत्र्यांची संपत्ती 118.07 कोटी रुपये इतकी आहे. काही मुख्यमंत्री असेही आहेत ज्यांची संपत्ती 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. देशात एकूण चार मुख्यमंत्री अब्जाधीश आहेत.

अब्जाधीश मुख्यमंत्र्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर डी.के. शिवकुमार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू असून त्यांच्याकडे 931 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते, टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांचा समावेश आहे. त्यांच्या नावावर 648 कोटी रुपयांची संपत्ती आहे. चौथ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू असून त्यांच्याकडे 332 कोटी रुपयांची संपत्ती आहे. थलपती विजय यांच्या संपत्तीबाबत बोलायचे झाल्यास, त्यांच्याकडे 404 कोटी रुपयांची चल संपत्ती आणि 220 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्याकडे 10 बंगल्यांचा मालकी हक्क असून चार व्यावसायिक इमारती देखील आहेत. त्यांच्या आलिशान घराची किंमत 70 ते 80 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) संस्थेने 31 विद्यमान मुख्यमंत्र्यांची संपत्ती आणि गुन्हेगारी नोंदीसंबंधीची माहिती जाहीर केली आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी 7.81 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे 1.97 कोटी रुपयांची संपत्ती असून त्यातील 30.35 लाख रुपये ही च्ल संपत्ती आहे. त्यांनी 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नावावर 5.31 कोटी रुपयांची संपत्ती आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याकडे 5.80 कोटी रुपयांची चल आणि अचल संपत्ती आहे. 2024 च्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे 1.54 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री

सर्वात कमी संपत्ती जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये जम्मू-काश्मीरचे उमर अब्दुल्ला आणि पश्चिम बंगालचे शुभेंदु अधिकारी यांचा समावेश आहे. उमर अब्दुल्ला यांनी 55 लाख रुपये तर शुभेंदु अधिकारी यांनी 85 लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे 1 कोटी रुपयांची संपत्ती आहे. उमर अब्दुल्ला यांनी कोणत्याही अचल संपत्तीची माहिती दिलेली नाही. एकूण 31 मुख्यमंत्र्यांपैकी 15 मुख्यमंत्र्यांची संपत्ती 11 ते 49 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. 1 कोटी रुपयांपेक्षा कमी संपत्ती असलेले फक्त दोन मुख्यमंत्री आहेत. सर्व मुख्यमंत्र्यांची एकत्रित संपत्ती सुमारे 3660 कोटी रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT