Monkeypox Virus  Saam TV
देश विदेश

Monkeypox Virus : जीवघेण्या मंकीपॉक्सची भारतात एन्ट्री; कोणाला धोका अधिक? पाहा व्हिडिओ

monkeypox virus in india : अखेर भारतात मंकीपॉक्सने एन्ट्री केलीच. परदेशातून आलेला एका व्यक्तीला मंकीपॉक्स झाल्याचं आढळून आलंय. मंकीपॉक्समुळे मृत्यूही होतो. त्यामुळे काय सावधगिरी बाळगायला हवी? मंकीपॉक्सची लक्षणं काय आहेत? पाहुयात हा रिपोर्ट.

Mayuresh Kadav

मुंबई : मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण भारतात आढळला आणि आरोग्य यंत्रणेची झोपच उडालीय. जीवघेणा मंकीपॉक्स आफ्रिका, बांगलादेश, पाकिस्तानात कहर माजवतोय. आता भारतात संशयित रुग्ण आढळल्याने सगळ्यांचंच टेन्शन वाढलंय. मंकीपॉक्स झालेल्या अनेक रुग्णांचा मृत्यूही होतो. त्यामुळे कोरोनानंतर मंकीपॉक्स हादेखील जीवघेणा ठरतोय. आफ्रिकेतून आलेल्या या रुग्णाला कॉरंटाईन करण्यात आलंय. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, मंकीपॉक्स देशभरात पसरला तर हाहाकार माजेल. त्यामुळे या मंकीपॉक्सची लक्षणं काय आहेत पाहुयात.

मंकीपॉक्सची लक्षणे काय?

ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी,

थंडी वाजणे, थकवा येणे,

डोळ्यांत सूज येणे, वेदनादायक पुरळ उठणे

काही रुग्णांना श्वास घेण्यास, गिळण्यात अडचण येते.

संसर्गानंतर साधारणपणे 5 ते 21 दिवसांत लक्षणं दिसतात. सध्या मंकीपॉक्स पाकिस्तान, आफ्रिका आणि बांगलादेशात धुमाकूळ घालतोय. या तिन्ही देशांना मंकीपॉक्सने विळखा घातलाय. त्यामुळे मंकीपॉक्स कसा पसरतो ते पाहुयात.

मंकीपॉक्स कसा पसरतो?

मंकीपॉस्क हवेतून पसरत नाही

रुग्णाच्या संपर्कातून, संक्रमित व्यक्तीच्या पुरळ किंवा फोडांतील पाण्याच्या संपर्कातून

डोळे, श्वसनसंस्था, नाक किंवा तोंडातून शरीरात मंकीपॉक्स प्रवेश करतो

संक्रमित व्यक्तीने वापरलेला बिछाना, कपडे आणि टॉवेलला स्पर्श करू नये.

अशा प्रकारे मंकीपॉक्स पसरत असून, रुग्ण सापडून संसर्ग झाल्यास हा आणखी वेगानं पसरू शकतो. त्यामुळे आपण काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहुयात.

मंकीपॉक्समुळे काय काळजी घ्यावी?

बाधित व्यक्तीचे विलगीकरण करावे

बाधित व्यक्तीचे मास्कने नाक आणि तोंड झाकावे

रुग्णाने वापरलेल्या वस्तूंचा वापर टाळावा

साबण, पाणी वापरून हात स्वच्छ ठेवावेत

रुग्णाची माहिती आरोग्य केंद्रात द्यावी.

मंकीपॉक्सचे कांगोमध्ये 18 हजार रुग्ण सापडलेयत. त्यातील 610 लोकांचा मृत्यू झालाय...आता आरोग्य मंत्रालयाकडूनही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्यायत. मंकीपॉक्स हा जीवघेणा आजार असून, तुम्ही काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT