Agni Prime Missile Saam Tv
देश विदेश

Agni Prime Missile: भारताचा विक्रम! पहिल्यांदाच धावत्या ट्रेनमधून लाँच केले अग्नी प्राइम मिसाईल

Agni Prime Missile Launched: भारताने अजून एक विक्रम केला आहे.भारताने अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. अग्नी प्राइम क्षेपणास्त्र रेल्वे आधारित मोबाईल लाँचरवरुन लाँच करण्यात आले आहे.

Siddhi Hande

भारत देश हा विकसनशील म्हणून ओळखला जातो. देशाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. रस्ते, इन्फ्रास्टकचर ते अगदी अंतराळातदेखील भारत देशाने आपले नाव कमावले आहे. आता भारताने अजून एक विक्रम केला आहे. भारताने अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे डीआरडीओने (DRDO) या मध्यम श्रेणीच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. हे नवीन क्षेपणास्त्र रेल्वे आधारित मोबाईल लाँचरवरुन प्रक्षेपित करण्यात आले आहे. भारताने पहिल्यांदाच रेल्वेवरुन क्षेपणास्त्र लाँच केले आहे. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आहे.

डिझाइन केलेल्या रेल्वे लाँचरवरुन क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे भारताने विक्रम केले आहे. भारत हा अशा देशांपैकी एक बनवा आहे की ज्यांच्याकडे कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टीम आहे. जी रेल्वेवर नेटवर्कवरुन क्षेपणास्त्र प्रक्षेपित करु शकते.

अग्नी प्राइम म्हणजे काय?

अग्नी प्राइम हे अग्नी सीरीजमधील सर्वात प्रगत क्षेपणास्त्र आहे. याची मध्यम श्रेणी आहे. हे क्षेपणास्त्र २००० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करण्यासाठी सक्षम आहे. या क्षेपणास्त्राची प्रगत नेव्हिगेशन प्रणाली शत्रूंना लक्ष्य करण्याची परवानगी देते. हे खूप कमी वेळात प्रक्षेपित होते. या क्षेपणास्त्राचे डिझाइन खूपच मजबूत आहे. ज्यामुळे याचे पाऊस,धूळ आणि उष्णतेपासून संरक्षण होते. हे क्षेपणास्त्र भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडसाठी (SFC) तयार करण्यात आले आहे.त्याची यशस्वी चाचणी आता करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT