India Rainfall Saam Tv
देश विदेश

India Rain Alert: महाराष्ट्रासह 'या' १२ राज्यात २ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

IMD Alert For India: हवामान खात्याने येत्या २४ तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Priya More

India Weather Update: देशातील अनेक राज्यात सध्या पावासाने हाहाकार (Heavy Rainfall) माजवला आहे. पावसामुळे आलेल्या पूरामुळे अनेक राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने येत्या २४ तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचे हवामान खात्याकडून (Weather Department) सांगण्यात आले आहे. तसंच या राज्यांना हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. या राज्यांना पावसांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व राज्यांमध्ये आजपासून २ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढच्या ४ ते ५ दिवसांत पूर्व, ईशान्य आणि पूर्व मध्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

२ ऑगस्ट रोजी उत्तर पश्चिम भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पूर्व राजस्थानमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तसंच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त १ आणि २ ऑगस्ट रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस पडेल. तर उत्तराखंडमध्ये २ ऑगस्टपर्यंत पाऊस पडेल. पूर्व उत्तर प्रदेशात १५ ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता आहे.

मध्य भारतात, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ३१ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. १ आणि २ ऑगस्टला पश्चिम मध्य प्रदेश आणि 2 ऑगस्टला विदर्भात मुसळधार पावसासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये १ आणि २ ऑगस्टला अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पूर्व मध्य प्रदेशात १ आणि २ ऑगस्टला आणि विदर्भात १ ऑगस्टला पाऊस पडेल.

तर, 1 ऑगस्ट रोजी पश्चिम भारतात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. २ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे. १ आणि २ ऑगस्ट रोजी दक्षिण भारतातील किनारपट्टी परिसर असलेल्या कर्नाटक आणि तेलंगणात मुसळधार ते अतिमुसळधार पावासाची शक्यता आहे. तर 2 ऑगस्ट रोजी कर्नाटकातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. तेलंगणामध्ये गेल्या आठवड्यापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT