India-Pakistan Tension on Baglihar Dam Saam Tv News
देश विदेश

Baglihar Dam : भारताचा मोठा निर्णय, पाकिस्तान हादरला; पाकड्यांवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा स्ट्राईक, नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले

India-Pakistan Tension : भारताने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातील पाणी रोखलं आहे. या धरणासोबतच भारताकडून झेलम नदीवरील किशनगंगा धरणातील पाण्याचा प्रवाहदेखील रोखण्याचा विचार केला जात आहे.

Prashant Patil

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत भारताची कारवाई सुरूच आहे. पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर काही दिवसानंतर आता भारताने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाण्याचा प्रवाह कमी केला आहे आणि झेलम नदीवरील किशनगंगा धरणातही अशाच उपाययोजनांची योजना आखत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातील पाणी रोखलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमधील रामबन येथील बगलिहार आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा हायड्रो पॉवर डॅमच्या माध्यमातून भारत पाकिस्तानात सोडल्या जाणाऱ्या पाण्याबाबत किती पाणी सोडायचं किंवा किती पाणी रोखून ठेवायचं याबाबत निर्णय घेऊ शकतो. म्हणजेच या धरणांच्या माध्यमातून पाकिस्तानला कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी रोखता येऊ शकते. धरणातून निघणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढवताही येऊ शकतो.

सिंधू जलवाटप करार?

सिंधू जलवाटप करार हा १९६० साली झाला होता. या करारानुसार सिंधू नदी तसेच या नदीच्या उपनद्यांच्या पाणीवाटपावर निर्णय घेण्यात आला होता. चिनाब नदीवर बगलिहार धरण आहे. दरम्यान, आता भारतानं सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचं पाणी रोखण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाकिस्ताना अनेक मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढू शकतो.

सिंधू जलवाटप करार स्थगित झाल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी वाढू शकतात. पाकिस्तानातील रिसर्च फर्म पाकिस्तान अॅग्रीकल्चर रिसर्चचे घशारीब शौकत यांनी याबाबत माहिती दिली आहे. या जलवाटप करारात ज्या नद्यांचा समावेश आहे, त्या नद्यांचे पाणी फक्त शेतीच नव्हे तर शहरांच्या गरजा, वीजनिर्मिती यासाठी देखील केला जातो, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; सोमनाथच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

SCROLL FOR NEXT