भारताची डरकाळी, पाकिस्तानच्या गुरकावण्या बंद; एअर स्ट्राइकच्या भीतीनं फुटला घाम social media
देश विदेश

India-Pakistan : भारताच्या वॉटर स्ट्राइक, डिजिटल स्ट्राइकनंतर एअर स्ट्राइकची भीती; पाकिस्तानला दरदरून घाम फुटला

India Pakistan Tension : पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर विनाकारण पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तान सरकारची भीतीनं बोबडी वळाली आहे. भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या मंत्र्यांना सरकारनं गप्प बसण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Nandkumar Joshi

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं कठोर पावलं उचलली. दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवली. त्यांचं पाणी बंद केलं. तसंच पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना भीक न घालता, जशास तसं प्रत्युत्तर देण्याची तयारी भारतानं केली आहे. भारतानं नाक बंद केल्यानंतरही तोंड उघडणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांची आता चांगलीच जिरली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारनं भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या मंत्र्यांना तोंड बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. तसेच भारताकडून होणाऱ्या संभाव्य एअर स्ट्राइकच्या भीतीनं सतर्कता बाळगली जात आहे.

जम्मू - काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी जोडला जात आहे. त्यामुळं भारतानं कठोर पावलं उचलत पाकिस्तानविरोधात पाच महत्वाचे निर्णय घेतले.

या निर्णयानंतर पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देणं सुरू झालं. त्यामुळं भारत-पाकिस्तान या दोन देशांत तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्याचवेळी भारतानंही डोळे वटारले. त्यामुळं पाकिस्तानला दरदरून घाम फुटला आहे. पंतप्रधान शरीफ यांच्या सरकारनं आपल्या मंत्र्यांना तोंड बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अलीकडेच, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि उपपंतप्रधान इशाक डार यांच्यासह अनेक नेत्यांनी दोन देशांत तणाव वाढण्यास कारणीभूत ठरणारी वक्तव्ये केली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारनं त्यांच्या मंत्र्यांना बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत, अशी सक्त ताकीद दिली आहे. अशा बेजबाबदार वक्तव्यांमुळं दोन्ही देशांमध्ये तणाव वाढू नये, अशी उपरती पाकिस्तान सरकारला आली आहे. आधीपासूनच आर्थिक चणचणीमुळं संघर्ष करत आहोत. त्यात परिस्थिती चिघळायला नको, असं आता पाकिस्तानला वाटू लागलं आहे, अशी माहिती सूत्रांनी माध्यमांना दिली.

रडार यंत्रणा अॅक्टिव्ह

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानला एअर स्ट्राइकची भीती सतावतेय. हा धोका आधीच ओळखण्यासाठी सियालकोट सेक्टरमध्ये रडार यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून फिरोजपूर सेक्टरपासून काही किलोमीटर अंतरावर हालचाली वाढवण्यात आल्या आहेत. अलीकडेच पाकिस्तानने सीमेपासून ५८ किलोमीटरवर टीपीएस ७७ रडार तैनात केली होती. त्याद्वारे एअर ट्रॅफिकवर लक्ष ठेवलं जातं, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT