पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढल आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सध्या हालचालींना वेग आला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज सकाळी पीएम मोदी यांची भेट घेतली. गेल्या ४८ तासांत ही त्यांची दुसरी भेट आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावपूर्व परिस्थितीमध्ये ही खूपच महत्वाची बैठक असल्याचे म्हटले जात आहे. भारत सरकारने ७ मे रोजी देशभरातील सर्वच शहरांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. १९९७ नंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आला आहे.
अजित डोवाल यांच्याव्यतिरिक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान तसंच तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांनी आतापर्यंत अनेक वेळा पीएम नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. सध्या बैठकांवर बैठका सुरू आहे. या बैठकांमुळे हालचालींना वेग आला असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व वेगवान हालचालींवरून असा अंदाज बांधला जात आहे की, पाकिस्तानविरोधात भारत कठोर कारवाई करू शकतो.
तर दुसरीकडे, पाकिस्तान देखील भारत कारवाई करेल यामुळे घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासह पाकिस्तानचे अनेक नेते सतत सतर्क आहेत. ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा सांगितले की, भारत कधीही नियंत्रण रेषेवर हल्ला करू शकतो. एवढंच नाही तर पाकिस्तानने आता आयएसआय प्रमुख असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली.
भारताने पाकिस्तानविरोधात राजकीय कारवाई देखील केली आहे. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्ससह अनेक देशांच्या राजदूतांना बोलावून भारताने पहलगाम दहशतवादी हल्ला कुणी केला आणि त्यासाठी काय तयारी केली आहे हे त्यांना सांगितले. ऐवढंच नाही तर जेव्हा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा तिथेही पाकिस्तानला टोमणे मारले गेले. कोणत्याही सदस्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.