India-Pakistan Tensions Saam tv
देश विदेश

India Pakistan Tension : पाकवर कोणत्याही क्षणी हल्ला, हल्ल्याची तारीख ठरली? कुणी दिले संकेत, पाहा व्हिडिओ

India Pakistan Tension update : भारत पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला करु शकतो... हे आम्ही म्हणतोय कारण अमेरिकेने भारताला तसे स्पष्ट संकेत दिलेत.. नेमकं अमेरिकेनं काय म्हटलंय? आणि भारत पाकिस्तानवर कधी हल्ला कऱणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Girish Nikam

२ मे २०११ ..पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लादेनचं निवासस्थान बेचिराख करून अमेरिकेने आपल्यावरील हल्ल्याचा बदला घेतला होता. याच २ तारखेचा धसका आता पाकिस्ताननेही घेतलाय कारण खुद्द अमेरीकेनेच पाकिस्तानवरील हल्ल्याच्या तारखेचे संकेत दिले आहेत.

आम्हाला आशा आहे की भारत या दहशदवादी हल्याला अशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही .आम्हाला आशा आहे की पाकिस्तान जर कुठल्याही प्रकारे जबाबदार असेल तर, दहशदवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारताला सहकार्य करेल.

एवढंच नाही तर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी लादेनचा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे भारताच्या संभाव्य कारवाईचे समर्थनच केलं आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही भारत ३६ ते ७२ तासांच्या आत हल्ला करू शकतो, असं म्हटलंय.

काय असू शकते भारताची रणनीती...

१. सीमा ओलांडून विशेष पथकाच्या मदतीने सर्वोच्च लक्ष्यांना ठार मारणे, भारताच्या विशेष दलांमध्येही अशी क्षमता आहे. हे ऑपरेशन पाकिस्तानच्या अंतर्गंत माहितीशिवायही करता येणार आहे.

२. भारतानेही इस्रायल किंवा अमेरिकेसारखे स्मार्ट ड्रोन हल्ले करावेत, जेणेकरून दहशतवाद्यांचा खात्मा करता येईल.

३. भारताने त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानमधील स्थानिक नेटवर्क किंवा दहशतवादविरोधी घटकांना सक्रिय करावे. जमिनीवरील लढाईपासून स्वतःला दूर ठेवून काम अप्रत्यक्ष मार्गाने केले पाहिजे, असाही सूर उमटतोय.

४. आधुनिक ट्रॅकिंग, सोशल मीडिया, कॉल इंटरसेप्टिंगद्वारे दहशतवाद्यांचे लाईव्ह लोकेशन ट्रेस करून इस्रायलसारखी कारवाई होऊ शकते.

भारताने आता पाकिस्तानविरुद्ध कोणतीही कारवाई केली तर जग ती दहशतवादाविरुद्धची कारवाई मानेल. या परिस्थितीत पाकिस्तान जास्त निषेध करू शकणार नाही. त्यामुळे भारत कशा पद्धतीने पाकवर हल्ला करणार? आणि तारीखही लादेन हल्ल्याची २ मे असणार का? याबद्दल्ल उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somwar che Upay: सोमवारी रूद्राक्षाचे करा 'हे' उपाय; यशाच्या शिखरावर पोहोचायला वेळ लागणार नाही

Ration Card KYC: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल १,५०,००० रेशन कॉर्ड बंद, मिळणार नाही धान्य; तुमचंही नाव आहे का?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

SCROLL FOR NEXT