India Inflation Rises To 4.45% In July | Food Prices Increase Saam tv
देश विदेश

Food Inflation : सर्वसामान्यांना झटका! अंडी-चिकनपासून लसूण-कांद्यापर्यंत सगळं महागलं, पाहा कोणत्या वस्तूंचे भाव भडकले

India Food Inflation : जुलैमध्ये भारताचा महागाई दर ४.४५ टक्क्यांवर पोहोचला. खाद्यपदार्थ, दूध, रेस्टॉरंट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर ताण वाढला आहे.

Alisha Khedekar

  • जुलैमध्ये भारताचा महागाई दर ४.४५ टक्क्यांवर

  • जूनमधील ४.३८ टक्क्यांपेक्षा वाढला

  • सर्वसामान्यांच्या घरखर्चावर मोठा परिणाम

  • रेस्टॉरंट आणि अकोमोडेशन क्षेत्रातील महागाई ७.७२ टक्क्यांवर

अलीकडे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण आणला आहे. जीवनोपयोगी वस्तूंपासून ते रोजच्या खाण्यापिण्यापर्यंतच्या खर्चात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटवर त्याचा परिणाम होत आहे. जुलै महिन्यात भारतात महागाई दर ४.४५ टक्क्यांवर पोहोचले . जूनमध्ये हा दर ४.३८ टक्के होता. ऑगस्ट महिन्यात सणासुदीच्या काळात ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

महागाई वाढण्यामागे मोठं आणि प्रमुख कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ. जुलैमध्ये खाद्य पदार्थांच्या किंमती ५.५२ टक्क्यांनी महागल्या. असमान मान्सून आणि बदलत्या वातावरणामुळे कांदा, आले आणि लसूण यांच्या किमती वाढल्या. याशिवाय अंडी, चिकन आणि खाद्यतेलाच्या दरातही वाढ झाली. अलीकडे महाराष्ट्रात दुधाच्या किमतीही वाढवण्यात आल्या.

बाहेर खाणे आणि राहण्याचा खर्चही वाढला आहे. रेस्टॉरंट आणि अकोमोडेशन क्षेत्रातील महागाई जुलैमध्ये ७.७२ टक्क्यांवर पोहोचली, तर जूनमध्ये ती ६.९१ टक्के होती. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीमुळे वाहतूक खर्चावरही परिणाम झाला आहे. नेहमी वापराच्या वस्तूंच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली. मात्र, कोअर महागाई ३.८ ते ४.३ टक्क्यांच्या आसपास स्थिर राहिली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, बोफा सिक्युरिटीजने पावसाच्या असमानतेमुळे आणि अल-निनोचा धोका लक्षात घेता पुढील काळात खाद्य महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम झाल्यास RBI कडून आर्थिक वर्ष २०२७ च्या ६ महिन्यात व्याजदरात एकूण ५० बेसिस पॉइंट्सची वाढ होऊ शकते असा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT