india independence day, Pm narendra Modi
india independence day, Pm narendra Modi Saam Tv
देश विदेश

महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या नेहरू-पटेल यांच्यापुढे मी नतमस्तक: पंतप्रधान नरेंद्र मोदी

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. 'मी जगभरात असलेल्या भारतप्रेमींना, भारतीयांना स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो. महात्मा गांधींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी स्वत:ला झोकून दिले आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा माझा प्रयत्न आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) म्हणाले.

स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेहरू, राजेंद्र प्रसाद, श्याम प्रसाद मुखर्जी, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, नानाजी देशमुख अशा असंख्य महापुरुषांसमोर नतमस्तक होण्याची आज संधी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भारतातील असा एकही कोपरा नव्हता, असा कोणताही काळ नव्हता, जेव्हा देशवासीयांनी शेकडो वर्षे गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही, आपले जीवन व्यतीत केले नाही, यातना सहन केल्या नाहीत, बलिदान दिले नाही. अशा प्रत्येक महापुरुषाला, प्रत्येक बलिदानाला नतमस्तक होण्याची आज आपल्या सर्व देशवासियांसाठी संधी आहे. स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या आणि स्वातंत्र्यानंतर देशाची उभारणी करणाऱ्या अनेक महापुरुषांना आदरांजली वाहण्याची आज संधी आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) म्हणाले.

'देश कृतज्ञ आहे, मंगल पांडे, तात्या टोपे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, असफाक उल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल, आमच्या अशा असंख्य क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवला होता. आजचा दिवस ऐतिहासिक आहे, एका पवित्र मैलाचा दगड, नवा मार्ग, नवा संकल्प आणि नव्या ताकदीने पाऊल टाकण्याचा हा शुभ प्रसंग आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Crime: संतापजनक! फिरण्यासाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीला लुटलं; निर्वस्त्र करत केली बेदम मारहाण

Lok Sabha 2024: लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान; महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात होणार चुरशीच्या लढती

Horoscope Today : मेहनतीचे मिळणार फळ, प्रवासातून पालटणार भाग्य; तुमच्यासाठी कसा जाईल सोमवार?

Rashi Bhavishya: वृषभसह 4 राशींसाठी सोमवार ठरणार लकी, तुमची रास?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT