Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सामनाच्या मुलाखतीची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा बॉम्ब पडलाय.
उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
Devendra Fadnavis on Uddhav ThackeraySaam Tv

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray:

>> विनोद पाटील

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सामनाच्या मुलाखतीची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा बॉम्ब पडलाय. फडणवीसांनी या मुलाखतीत 25 वर्षांपूर्वीच्या युतीच्या सत्तांतराबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यात त्यांनी लक्ष्य केलंय ते उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा आणि 1999मध्ये युतीच्या गेलेल्या सत्तेला त्यानी उद्धव ठाकरेंनाच कारणीभूत ठरवलंय.

देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''खरे तर उद्धवजींना युतीची सत्ता आल्यानंतर 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडू लागली होती. 1999च्या निवडणूक निकालांनंतर त्यांचं नाव पुढे येईना म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली.''

उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
Fourth Phase Voting : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान, राज्यातील 11 जागांवर मतदार देणार कौल

फडणवीसांच्या या आरोपांना संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर देत फडणवीसांवर तिखट शब्दांत टीका केलीय. 1999 साली फडणवीस पहिल्यांच विधानसभेत निवडून आले होते. त्यामुळे त्यांनी फडणवीसांचा राजकारणातलं कच्चं मडकं, असा उल्लेख केलाय.

उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
Raj Thackeray: महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनीच सुरु केलं, राज ठाकरेंचा पवारांवर घणाघात

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेने आलेली सत्ता मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे गेली आणि राज्यात नवी राजकीय समीकरणं जन्माला आली. भाजपनं यासाठी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलं. आता फडणवीसांनी थेट 25 वर्षें मागे जात पहिल्या युती सरकारच्या सत्तांतरालाही उद्धव ठाकरेंनाच जबाबदार ठरवलंय. त्यामुळे भविष्यात भाजप आणि ठाकरे युतीच्या राजकीय इतिहासातले एकमेकांचे किती गौप्यस्फोट उकरून काढणार याबाबत उत्सुकता लागलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com