Horoscope Today : मेहनतीचे मिळणार फळ, प्रवासातून पालटणार भाग्य; तुमच्यासाठी कसा जाईल सोमवार?

Horoscope Today 13 May 2024 : आजचे राशिभविष्य, १३ मे २०२४ : मेहनतीचे मिळणार फळ, प्रवासातून पालटणार भाग्य; तुमच्यासाठी कसा जाईल सोमवार?, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
Horoscope Today 13 May 2024
Horoscope Today 13 May 2024Saam TV

आजचे पंचांग १३ मे २०२४

वार - सोमवार. तिथी - शु.षष्ठी. नक्षत्र - पुनर्वसू. योग - शूल. करण - तैतील रास - कर्क. नरसिंह नवरात्र. दिनविशेष - उत्तम दिवस.

मेष : डोके शांत ठेवून काम करा

डोके शांत ठेवून काम करा. तर अनेक नव्या संधी समोर उभ्या राहतील. वेगळे काहीतरी काम करण्याची उर्मी आज दाटून येईल.

वृषभ : पैशाची आवक चांगली राहील

पैशाची आवक चांगली राहील. आणि म्हणून कुटुंबीयांबरोबर मेजवानीचे बेतही आखले जातील. एकूणच येणे जाणे या गोष्टींची वर्दळ मनात आणि घरात दोन्हीकडे राहील.

मिथुन : व्यक्तिमत्व उजळून निघेल

आज आपले व्यक्तिमत्व उजळून निघेल. एक वेगळीच सकारात्मकता आजूबाजूला राहणार आहे. बंधन न ठेवता बंधनात राहणे आज आपल्याला जमणार. दिवस मस्त जाईल.

कर्क : पैसा थोडा जपून वापरा

पैसा व खर्च याचा समन्वय साधताना आज तारांबळ उडेल . पैसा कितीही आला तरी जाण्याच्या वाटा आधीच ठरलेल्या असतात. म्हणून जरा हात आखडता ठेवलेला बरा.

सिंह : मेहनतीचे फळ मिळणार

काही गुंतवणूक खूप वर्ष आधी केलीये का? त्याचे फळ पैशाच्या स्वरूपात किंवा प्रेमाच्या स्वरूपात आज दुपटीने मिळणार.

कन्या : आपल्याच ऐटीत राहाल

विशेष लक्ष आज कामावर घालाल. पण लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीत द्विधा मन:स्थितीत राहून काम करू नका. आपल्याच ऐटीत राहाल. इतरांकडून कामे करून घ्याल.

Horoscope Today 13 May 2024
Vrishabh Rashi Personality : वृषभ राशीचे लोक सर्वांनाच हवेहवेसे का वाटतात? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

तूळ : प्रवासातून भाग्य पालटणार

प्रवास होणार. प्रवासातून भाग्य पालटणार. अध्यात्म व ध्यान यावर आज विशेष लक्ष केंद्रित करा. सद्गुरूंची ओढ वाटेल.

वृश्चिक : सगळी कामे एकटेच कराल

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" हे तुम्हाला वेगळे सांगायला नको. सगळी कामे एकटेच कराल. दगदग वाढेल. पण तरीसुद्धा स्वास्थ काही मिळणार नाही.

धनु : कामे मनासारखी होतील

कोर्टकचेरीची कामे मनासारखी होतील. कधीकधी आपली चूक नसताना सुद्धा एखाद्या गोष्टीत अडकलो गेलो. याची जाणीव होईल. पण दिवसा अखेरीस सर्व अलबेल असेल.

मकर : दिवस सहजतेने घालवा

कष्ट कष्ट आणि कष्ट. असा दिवस आजचा आहे. खूप धावपळ. खूप दगदग. म्हणूनच शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष न करता दिवस सहजतेने घालवा.

कुंभ : शंकराची उपासना फलदायी ठरेल

सृजनशीलता वाढेल. आज दिवस खास उपासनेसाठी राखून ठेवा. शंकराची उपासना फलदायी ठरेल. मनस्वास्थ लाभेल.

मीन : लुटा आनंद घराचा

घरातील टापटीप पणात व नीटनेटकेपणा यामध्ये आज वेळ घालवाल. शांत स्वस्थ मन आणि नीटनेटके घर यामध्येच आज आपला वेळ जाईल. लुटा आनंद घराचा.

Horoscope Today 13 May 2024
Rashi Bhavishya : पैशांची आवक वाढेल, पुढे जाण्याचे मार्ग मिळतील; तुमच्या नशीबात आज काय लिहलंय? जाणून घ्या

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com