Baramati Crime: संतापजनक! फिरण्यासाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीला लुटलं; निर्वस्त्र करत केली बेदम मारहाण

Couple Looted In Baramati : दोन गावगुंडांनी एका जोडप्याला लुटल्याची घटना बारामती विमानतळ परिसरात घडलीय. या गावगुंडांनी जोडप्याला निर्वस्त्र करत त्यांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आलीय.
 Crime news
Crime news Saam Tv file pic

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर येतेय. एका महाविद्यालयीन जोडप्याला दोन गाव गुंडांनी निर्वस्त्र करत बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलीच्या अंगावरील दागिने काढून घेतल्याची घटना विमानतळाच्या परिसरात घडलीय. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. विमानतळाच्या परिसरात अशा लुटमारीच्या घटना घडत असल्याने नागरिकांकडून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला जात आहे.

याप्रकरणी मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, बारामतीतील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एक युवती मोटारीतून आपल्या मित्रासह बारामती विमानतळ परिसरात फिरण्यासाठी गेली होती. ते कारमध्ये बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या दोन गावगुंडांनी चाकूचा दाखवत युवतीच्या अंगावरील ९० हजारांचे दागिने काढून घेतले. त्यानंतर दोघांच्या अंगावरील कपडे बळजबरीने काढायला लावले. जोडप्याला निर्वस्त्र केल्यानंतर त्यांचे फोटो काढून घेतले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत या दोघांनी जोडप्याला बेदम मारहाण केली.

याप्रकरणी बारामती पोलिसांनी दोन अनोळखी अज्ञातांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलाय. ही घटना बारामती तालुक्यातील विमानतळाजवळ गोजुबावी गावाच्या हद्दीत घडलीय. या घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या बाजूला पीडित जोडपं फिरत होते, त्यावेळी तेथे ३५ वयोगटातील दोन जण तोंडाला मास्क लावून तेथे आले. त्या दोघांनी युवतीसह तिच्या मित्राला चाकूचा धाक दाखवत मुलीच्या गळ्यातील ७० हजारांची सोन्याची साखळी आणि कानातील टॉप्स असे ९० हजार रुपयांचे दागिने काढून घेतले.

दागिने घेतल्यानंतर आरोपींनी मुलीच्या मित्राला दगडाने मारहाण केली. मारहाण केल्यानंतर दोघांनाही कारमधून बाहेर काढत खड्डा असलेल्या ठिकाणी त्यांच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने उतरायला भाग पाडलं. या जोडप्याचे निर्वस्त्र अवस्थेतील फोटो काढून घेतले. पोलिसात गेला तर तुमचे काढलेले फोटो व्हायरल करू, अशी धमकी या लुटारूंनी दिली असल्याची माहिती पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारी म्हटलंय.

 Crime news
Pune Crime : १०० सीसीटीव्ही तपासून आरोपी ताब्यात; बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com