plane  Saam tv news
देश विदेश

चीनमधील विमान अपघातानंतर भारत सर्तक; डीजीसीएचा मोठा निर्णय

चीनमध्ये सोमवारी १३२ प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग विमान कोसळले आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: चीनमध्ये सोमवारी १३२ प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग विमान कोसळले आहे. चीनच्या नागरी उड्डाण प्रशासन (CAAC) ने दिलेल्या माहितीनुसार की, विमानाने (plane) कुनमिंग शहरापासून ग्वांगझूच्या दक्षिणेकडे उड्डाण केले आणि गुआंग्शी प्रदेशामध्ये त्याचा रडार संपर्क तुटला आहे. यानंतर हा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातावर भारतीय (Indian) हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय हाती घेतला आहे. (India high alert after plane crash China decision DGCA)

हे देखील पहा-

डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले आहे की, भारतीय विमान कंपन्यांच्या बोईंग ७३७ ताफ्यावर अतिरिक्त पाळत ठेवली जाणार आहे. DGCA प्रमुख अरुण कुमार दिलेल्या माहितीनुसार, चायना इस्टर्न एअरलाइन्सचे बोईंग ७३७-८०० विमान अपघातावर भारताने आपल्या बोईंग ७३७ विमानांची अतिरिक्त देखरेख आणि पाळत ठेवण्याचा निर्णय (Decision) हाती घेतला आहे.

यावेळी ते म्हणाले आहे की, उड्डाण सुरक्षा ही गंभीर विषय आहे आणि आम्ही परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत आहे. सध्या आम्ही आमच्या ७३७ विमानांवर पाळत ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. स्पाईसजेट, विस्तारा आणि एअर इंडियाकडे भारतात त्यांच्या ताफ्यात बोईंग ७३७ विमाने आहेत. ऑक्टोबर २०१८ ते मार्च २०१९ या ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये, २ बोईंग ७३७ MAX विमाने क्रॅश होऊन एकूण ३४६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

या २ अपघातांनंतर भारताने मार्च २०१९ मध्ये बोईंग ७३७ MAX विमानांवर भारतामध्ये बंदी घालण्यात आली आहे. DGCA च्या समाधानासाठी बोईंगने सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक सुधारणा केल्यानंतर मागील वर्षी ऑगस्टमध्ये विमानाच्या व्यावसायिक ऑपरेशनवर बंदी उठवण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT