LPG Cylinder Saam TV News
देश विदेश

गॅसच्या किमतीचा भडका उडणार? फक्त १६ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक, इराण इस्त्रायल युद्धाच्या झळा बसणार | LPG

LPG Shortage in India: इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतातील एलपीजी साठा फक्त १६ दिवसांचा उरला आहे. ३३ कोटी कुटुंबांना फटका बसण्याची शक्यता.

Bhagyashree Kamble

भारतीय स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या एलपीजी सिलिंडरपैकी तब्बल ६६ टक्के गॅस परदेशातून आयात केला जातो. त्यातील ९५ टक्के पुरवठा सौदी अरेबिया, यूएई आणि कतारसारख्या पश्चिम आशियातील देशांकडून होतो. सध्या इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे या भागातील तणाव वाढला आहे. याचा थेट परिणाम भारतातील एलपीजी पुरवठ्यावर होताना दिसत आहे. सध्या भारतात १६ दिवस पुरले इतकाच एलपीजी साठा शिल्लक आहे.

फक्त १६ दिवस पुरेल इतकाच एलपीजी साठा शिल्लक

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील एलपीजी साठवण क्षमतेनुसार सध्या फक्त १६ दिवस पुरेल इतकाच सिलिंडर शिल्लक आहे. देशातील जवळपास ३३ कोटी कुटुंबे एलपीजीवर अवलंबून आहेत. त्यामुळे येत्या काळात एलपीजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

युद्धामुळे पुरवठा खंडित होण्याची शक्यता

उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मते, इराणच्या अणुउत्पादन स्थळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे जागतिक तेलपुरवठा धोक्यात आला आहे. या युद्धाचा एलपीजी गॅससह इंधनाच्या किंमतींवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

पर्यायी देशांकडून आयात शक्य

अमेरिका, युरोप, मलेशिया आणि आफ्रिकेतील काही देशांकडूनही एलपीजी आयात करण्याचा पर्याय आहे, परंतु या देशांमधून भारतात गॅस पोहोचण्यास अधिक वेळ लागतो.

वीजेचा वापर करून स्वंयपाक

देशातील केवळ १.५ कोटी घरांपर्यंत पाईपद्वारे पीएनजीद्वारे गॅस पुरवठा होतो. त्यामुळे बहुसंख्य नागरिकांसाठी हा पर्याय उपलब्ध नाही. तसेच रॉकेल हा पर्यायही जवळपास बंद झाला आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये एलपीजीअभावी विजेवर स्वयंपाक करणे हाच एकमेव पर्याय उरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : दवाखान्यावर खर्च होणार, मित्रांच्या चुका माफ करणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जाणून घ्या

Morning Health Tips: रोज सकाळी पोट साफ होत नाही? आहारात करा 'हे' 5 बदल

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT