Coronavirus Travel Update News In Marathi
Coronavirus Travel Update News In Marathi SAAM TV
देश विदेश

India Coronavirus Update: भय इथले संपत नाही! देशात 24 तासांत 10,542 कोरोना रुग्णांची नोंद, 38 जणांचा मृत्यू

Priya More

Delhi News: देशामध्ये कोरोनाचा (Coronavirus) वेग वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये 10 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 38 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या रोज समोर येणाऱ्या धडकी भरवणाऱ्या आकड्यामुळे केंद्रासोबतच (Central Government) राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) बुधवारी जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांमध्ये 10,542 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे देशातील संक्रमित कोरोना रुग्णांचा आकडा 4,48,45,401 वर पोहचला आहे. तर देशात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 63,562 वर पोहोचली आहे.

तर, गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा लक्षात घेता देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,31,190 वर पोहचली आहे. भारतात कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 4.39 टक्के झाला आहे तर साप्ताहिक दर 5.1 टक्के झाला आहे.

सध्या देशात 63,562 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत जे एकूण प्रकरणांपैकी 0.14 टक्के आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.67 टक्के आहे. महत्वाचे म्हणजे, आतापर्यंत देशात एकूण 4,42,50,649 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसींचे 220,66,27,758 डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान, कोरोनाने देशात पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशातील अनेक राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्य सरकारांना उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT