China Beijing Hospital Fire: रुग्णालयात भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू; काहींनी एसीवर चढले तर काही...

China Fire in Hospital: चीनमध्ये आगीच्या दोन वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
Beijing Hospital Fire News
Beijing Hospital Fire Newssaam tv

Beijing Hospital Fire News: चीनची राजधानी बीजिंगमधील एका रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही आग एवढी भीषण होती की त्याचे लोळ आणि धुराचे लोट दूरवर दिसत होते.

याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णालयातून ७१ जणांची सुटका केली. इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Beijing Hospital Fire News
Accident News: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 4 वाहनं एकमेकांना धडकली, पिता-पुत्राला मृत्यूने गाठलं

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही आग स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.57 च्या सुमारास लागली. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दीड तास लागला. बीजिंगमधील चांगफेंग हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. (fire news)

एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हे दुःखद आहे. मी माझ्या घराच्या खिडकीतून अपघाताचे भीषण दृश्य पाहत होतो. दुपारी अनेक लोक एसी युनिटवर उभे होते. रुग्णालयातील आग भडकल्याने भीतीपोटी काही लोकांनी रुग्णालयावरून खाली उड्या मारल्या. यात अनेक जण जखणी झाले.

Beijing Hospital Fire News
Mumbai News: मंत्रालयात उंदरांचा धुडगूस; विभागातील कागद व फायली कुरतडल्या

दुसरीकडे, चीनच्या पूर्वेकडील झेजियांग प्रांतातील जिन्हुआ शहरातील वुई काउंटीमध्ये सोमवारी एका कारखान्याला लागलेल्या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अशा प्रकारे चीनमध्ये दोन घटनांमध्ये 32 जणांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com