Coronavirus Updates  Saam Tv
देश विदेश

Coronavirus Update: चिंता वाढली! देशात गेल्या 24 तासांत 10,112 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; सक्रीय रुग्णांचा आकडा 67 हजार पार

Latest News: गेल्या काही दिवसांपासून दिवसांला 10 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर येत आहेत.

Priya More

Delhi News: देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसांला 10 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर येत आहेत. यासोबत कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) मृतांचा आकडा देखील वाढत आहे. गेल्या 24 तासांत 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. अशामध्ये देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 67 हजार पार झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशामध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेले 10,112 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 67,806 वर पोहोचली आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Corona Patient) लक्षात घेता सरकारसोबतच सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय कोरोना रिकव्हरी रेट 98.66 टक्के आहे. कोरोनापासून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,42,83,021 वर पोहोचली आहे, तर डेट रेट 1.18 टक्के झाला आहे. तर देशभरातील जनतेला कोरोनावरील लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

अशामध्ये, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील सर्व राज्य सरकारने कंबर कसली असून उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या मास्कचा वापर करणे अनिवार्य केला आहे. त्याचसोबत नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सुप्रिया सुळेंचा वंचितच्या शहर अध्यक्षांना फोन...

NPS Rule: कामाची बातमी! NPS च्या नियमात मोठा बदल; ₹५००० महिन्याला गुंतवा अन् ९२ लाख मिळवा

Christmas Celebration : भारतात ख्रिसमस कसा साजरा केला जातो? जाणून घ्या

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं; बॉयफ्रेंडला अटक

Western Railway : पश्चिम रेल्वेवर 'या' दिवशी ३०० लोकल रद्द! नेमकं कारण काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT