Arshdeep Singh Wickets: अर्शदीप सिंगने तोडलेल्या LED स्टंपची किंमत ऐकूण बसेल धक्का! BCCIचं लाखोंचं नुकसान

LED Stumps Price: पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंग विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात अर्शदीपने घातक गोलंदाजी करत 4 बळी घेतले.
Arshdeep Singh Destroys LED Stumps
Arshdeep Singh Destroys LED StumpsSAAM TV
Published On

Arshdeep Singh Destroys LED Stumps: वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या 31व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग आमनेसामने आले होते. या रोमांचक सामन्यात पंजाबने 13 धावांनी मुंबईवर विजय मिळवला. या सामन्यात पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात अर्शदीप सिंगने घातक गोलंदाजी करताना 4 बळी घेतले.

शेवटच्या षटकात मुंबई विजय मिळवणार अशी शक्यता असताना अर्शदीप सिंगने आपल्या वेगवान चेंडूंवर सलग दोन विकेट घेतल्या. विशेष म्हणजे त्याने दोन्ही चेंडूवर मंधले स्ंटप तोडले ((Arshdeep Singh Broke LED Stumps Twice). या सामन्यात आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर अर्शदीपने पंजाबला विजय मिळवून दिला.

मात्र अर्शदीपने तोडलेल्या स्टंपची किमत (Cost of LED stumps) तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर या एलईडी स्टंपची किंमत ऐकूण तुम्हाला धक्का बसेल. आज आम्ही तुम्हाला या एलईडी स्टंपची (LED Stumps) किंमत सांगत आहोत.

Arshdeep Singh Destroys LED Stumps
MI vs PBKS Result: सूर्यकुमार-ग्रीनची धुव्वाधार फलंदाजी; पण अर्शदीपने एका षटकातच सामना फिरवला, पंजाबचा थरारक विजय

लाखोंच्या घरात आहे किंमत

मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात सलग दोन चेंडूंमध्ये दोन स्टंप तोडले. यामुळे बीसीसीआयचं लाख दोन लाख रुपयाचं नाही तर तब्बल 35 लाख रुपयांहून अधिकचं नुकसान झालं आहे. अर्शदीपने तोडलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज एलईडी स्टंपच्या सेटची किंमत 5 किंवा 10 लाख नाही तर तब्बल 35 ते 40 लाख रुपयांच्या घरात आहे.

बिग बॅश लीगमध्ये पहिल्यांदा वापर

आयसीसीने 2013 च्या विश्वचषकादरम्यान पहिल्यांदा हे एलईडी स्टंप स्वीकारले होते. त्याआधी ते ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बिग बॅश लीगमध्ये वापरले गेले. बिग बॅश लीगमधील त्यांचा उपयोग पाहून आयसीसीने 2013च्या विश्वचषकात पहिल्यांदा त्यांचा वापर केला. अंपायरिंगसाठी मदत करणाऱ्या तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने हे स्टंप जगातील सर्वात महागडे स्टंप आहेत.

हे LED स्टंप सध्या एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये वापरले जातात. या स्टंपवर असलेल्या बेल्समधील मायक्रोप्रोसेसर हालचालींना प्रतिसाद देतो. या अत्याधुनिक बेल्स असलेल्या स्टंपमध्ये उच्च दर्जाच्या बॅटरी असतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा चेंडू बेलवर आदळतो तेव्हा आपोआप लाल दिवा पेटतो. (IPL 2023)

Arshdeep Singh Destroys LED Stumps
LSG VS GT Match Result: हातातून निसटणारा सामना मोहित शर्माने फिरवला; गुजरातचा लखनऊवर थरारक विजय

अर्शदीपची आक्रमक गोलंदाजी

मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने अत्यंत घातक गोलंदाजी केली. या सामन्यात अर्शदीपने 4 षटके टाकली आणि 29 धावां देत 4 बळी घेतले. मुंबई इंडियन्सला समोर दिसणारा विजय अर्शदीप सिंगने घातक गोलंदाजीच्या जोरावर हिरावून घेतला. अर्शदीप सिंगने देखील आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत 7 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. (Latest Sports News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com