LSG VS GT Match Result: हातातून निसटणारा सामना मोहित शर्माने फिरवला; गुजरातचा लखनऊवर थरारक विजय

LSG Vs GT Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३० वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला
mohit sharma
mohit sharma saam tv

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३० वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुलने अप्रतिम खेळी केली. मात्र लखनऊ सुपर जायंट्स संघाला ७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हा गुजरात टायटन्स संघाचा या हंगामातील चौथा विजय आहे. या विजयासह गुजरात टायटन्स संघाने गुणतालिकेत आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे.

गुजरातने केल्या १३५ धावा..

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात टायटन्स संघाकडून फलंदाजी करताना शुभमन गिल शून्यावर माघारी परतला. तर वृद्धिमान साहाने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने ६ चौकारांच्या साहाय्याने ४७ धावांची खेळी केली. तर कर्णधार हार्दिक पंड्याने एकहाती किल्ला लढवत ५० चेंडूंचा सामना करत २ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ६६ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १३५ धावा केल्या.

केएल राहुलची मॅच विनिंग खेळी व्यर्थ..

या धावांचा पाठलाग करताना काईल मेयर्स आणि कृणाल पंड्या सारख्या फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र दोघेही मोठी खेळी करू शकले नाही.काईल मेयर्सने २४ धावांची खेळी केली. तर कृणाल पंड्या २३ धावा करत नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला. केएल राहुल देखील विजय समोर असताना बाद होऊन माघारी परतला. शेवटी मोहित शर्माने अप्रतिम गोलंदाजी करत गुजरातला विजय मिळवून दिला.

दोन्ही संघांची प्लेइंग ११:

लखनऊ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, आवेश खान, रवी बिश्नोई.

गुजरात टायटन्स : वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com