Corona Update News Saam tv
देश विदेश

India Corona Update: धोका कायम! गेल्या 24 तासात 20 हजारांहून अधिक रुग्ण

56 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भारतात कोरोना प्रकरणांचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. जगभरात अद्यापही कोरोनाचा (Corona) फैलाव सुरु आहे. भारतातही कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी वीस हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 20,044 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 56 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे देखील पाहा -

यानंतर, कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1,40,760 वर पोहोचली आहे. यासह देशात कोरोनाबळींचा आकडा 5 लाख 25 हजार 660 वर पोहोचला आहे. कोरोनाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 18,301 लोक कोरोनमुक्त झाले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

एकीकडे पावसामुळे वाढणारे संसर्गजन्य आजार आणि दुसरीकडे देशात झालेला मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव त्यात कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. भारतातील दैनिक सकारात्मकता दर 4.80 टक्के आहे. रिकव्हरी रेटबद्दल बोलायचे झाले तर देशात संसर्ग बरे होण्याचे प्रमाण ९८.४८ टक्के आहे.

लसीकरणाचा आकडा 199.71 कोटी

लसीकरणाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर भारत २०० कोटींचा आकडा पार करण्याच्या अगदी जवळ आला आहे. देशातील एकूण लसीकरणाचा आकडा सध्या 199.71 कोटी आहे. गेल्या 24 तासात 22,93,627 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

रोहित शर्माचा तोडफोड षटकार! '12 हजारी मनसबदार' हिटमॅनचा खतरनाक अंदाज, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: शरद पवार करणार दुष्काळ दौरा, पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

Maharashtra weather : बळीराजाची चिंता वाढली! राज्यातून मान्सूनची 'एक्झिट; मराठवाडा अन् विदर्भात पावसाची भयंकर तूट

Pradeep Purnekar : ठाण्यात शिंदे शासन आहे का? पूर्णेकर प्रकरणानंतर संजय राऊत यांचा पोलीस ठाण्यातून संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT