बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी बोलावली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक; हिंगोलीत पुन्हा वाद पेटणार?

MLA Santosh Bangar Latest News | उद्धव ठाकरेंनी बांगर यांची शिवसेनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षापदावरून हकालपट्टी केलेली असतानाही त्यांनी बैठक बोलवली आहे.
MLA Santosh Bangar Hingoli
MLA Santosh Bangar HingoliSaam Tv
Published On

हिंगोली: उद्धव ठाकरेंसाठी ढसाढसा रडणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. बंडखोरी केल्याने त्यांची शिवसेनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षापदावरून हकालपट्टी करण्यात आली. हे वृत्त शिवसेनेच्या मुखपत्रातही छापून आलं होतं. तरिही आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरेंनी बांगर यांची शिवसेनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षापदावरून हकालपट्टी केलेली असतानाही त्यांनी बैठक बोलावल्याने शिवसेना नक्की कुणाची? उद्धव ठाकरेंची की, एकनाथ शिंदेंची असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

हे देखील पाहा -

शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, तरिही त्यांनी शिवसैनिकांना आज, शनिवारी बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले. याविरोधात शिवसेनेचे हिंगोली, नांदेड, बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी प्रसिद्धीपत्रक काढत शिवसेनेने अशी कोणतीही बैठक बोलावली नसून बैठकीला जाऊ नये असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे. त्यामुळे नक्की कुणाचा आदेश मानायचा अशा पेचात हिंगोलीतले शिवसैनिक पडले आहेत.

आमदार संतोष बांगर यांनी केलेलं आवाहन

उद्या दिनांक १६/०७/२०२२ रोज शनिवार ला सकाळी ठीक १०:०० वाजता हिंगोली जिल्हा शिवसेनेतील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, जि. प. सदस्य, प. स. सदस्य, सर्व सभापती, उप तालुकाप्रमुख, सर्कल प्रमुख, शाखाप्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक, शहर प्रमुख व इतर शिवसेना अंगीकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक विश्रामगृह हिंगोली येथे आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर साहेब यांनी केले आहे.

शिवसेनेचे हिंगोली, नांदेड, बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी केलंंलं आवाहन

शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर बांगर यांनी केलं होतं शक्ती प्रदर्शन

शिवसेनेतून हकालपट्टीनंतर संतोष बांगर चांगलेच संतापले होते. हकालपट्टीनंतर ११ जुलैला बांगर हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल झाल्यावर बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन शक्तिप्रदर्शन केलं. मुख्यमंत्री शिंदे यांनीही आमदार संतोष बांगर यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'संतोष बांगर आणि सर्व पदाधिकारी इथे आले आहे. त्यांची शक्ती किती आहे, त्यांनी दाखवून दिली आहे. त्यांची विकासकामे प्रश्न असतील त्यांना आम्ही मदत करू. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गट आहे. ज्यांना हिंदुत्वाची भूमिका पटत आहे, ते सोबत येत आहे. विकास कामं राज्य सरकार कुठेही प्रलंबित ठेवणार नाहीत. सेना आणि भाजप युतीचं सरकार विकास कामं करतील. माझ्या संपर्कात ज्यांना आमचे विचार पटलेले आहेत, त्यांना आमच्या सोबत काम करायचं आहे'.

MLA Santosh Bangar Hingoli
Gopichand Padalkar : 'सत्ता गेल्याचे सुतक अजूनही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर'
शिवसेनेला दे धक्का

शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीच्या काही तासांपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का देत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात दाखल झाले होते. बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार ज्यावेळी गुवाहाटी येथे पोहोचले होते, तेव्हा आमदार संतोष बांगर यांनी आक्रमक दिसले होत. त्यांनी या बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन देखील केले होते. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं त्यांनी दाखवलं होतं. मात्र ते अचानक शिंदे गटात सामील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

कोण आहेत संतोष बांगर

मराठवाड्यातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळख आहे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोकणात जाऊन कोथळा काढू अशी धमकी दिल्याने आमदार बांगर हे चर्चेत आले होते, आमदार बांगर हे कायम ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ होते मात्र , एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर त्यांनी देखील शेवटी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात एंट्री केली होती. यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com