Corona Virus  - Saam Tv
देश विदेश

India Corona Update: दिलासादायक! देशात कोरोनाचा वेग मंदावला, 24 तासांत 7 हजार रुग्णांची नोंद

Latest News: देशामध्ये कोरोना (Covid-19) रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Priya More

Delhi News: कोरोनाने (Corona Virus) पुन्हा एकदा सर्वांच्या चिंतेत वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रोज कोरोना रुग्णांचा धडकी भरवणारा आकडा समोर येत आहेत. अशामध्ये भारतीयांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. देशामध्ये कोरोना (Covid-19) रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 7 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 7,178 नवीन कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळले आहेत. आता देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ही 65,683 इतकी झाली आहे. तर देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 98.67 टक्के नोंदवला गेला आहे.

अशामध्ये रविवारी कोरोना रुग्णांचा जो आकडा समोर आला आहे तो दिसाला देणारा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये 10 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद होत होती. अशामध्ये गेल्या 24 तासांत 7 हजार पार रुग्ण आढळल्यामुळे कुठे तरी कोरोना रुग्णात घट होऊन कोरोनाचा वेग मंदावला असल्याचे म्हणता येईल

आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार 10,112 नवे रुग्ण आढळले होते. ही रुग्णसंख्या लक्षात घेता आज जाहीर केलेल्या रुग्णसंख्येत तब्बल 3 हजारांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, देशामध्ये सतत कोरोना रुग्णांची होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व राज्य सरकारला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्याचसोबत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT