
संजय डाफ, नागपूर
Nagpur News: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मोदी नावाचे वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील', असा घणाघात त्यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षातून निलंबित झालेले आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीनंतर नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे म्हणतात पाकिस्तानी लोकांना माहित आहे शिवसेना कुणाची आहे. हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांना पाकिस्तानी जनतेला प्रमाणपत्र मागावं लागतंय. त्यांना भारतीय लोकांवर विश्वास नाही.' तसंच, 'उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्त्व कसं सोडलं? याचं प्रमाणपत्र देश आणि महाराष्ट्राने दिलंय. रोज लोकं सोडून जात आहे.', अशी टीका त्यांनी केली.
'मोदीजींचा ऐकेरी उल्लेख करतात. मोदीजींना या देशानं पसंती दिली आहे. मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील. उद्धव ठाकरेंना मोदींची भीती वाटतेय.', असा देखील घणाघात यावेळी बावनकुळे यांनी केला. तसंच, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेतृत्वाचा अभाव आहे, संधी मिळाली होती पण त्यात ते अपयशी ठरले. त्यांच्या काळात 4 हजार कोटी कंपन्यांनी खाऊन टाकले. खोटं बोलू पण रेटून बोलू अशी उध्दव ठाकरे यांची अवस्था झाली.', असल्याचे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली. 'संजय राऊत तुम्ही कशाला चॅलेंज करत आहेत, मोदी नावाचे वादळ येणार आहे. संजय राऊतांना ज्या सवयी झाल्या आहेत, त्या प्रमाणे ते बोलत आहे. आमच्या रक्तात धोका देणे नाही. पाठीत खंजीर खुपसने त्यांच्या रक्तात आहे.' अशी टीका बावनकुळे यांनी केली.
तसंच, 'मुख्यमंत्री बदलले जातील अशी अफवा संजय राऊत आणि महाविकास आघाडीकडून पसरवली जात आहे. संजय राऊत आता महाविकास आघडीचे वाटोळे करतील.', असं देखील त्यांनी सांगितलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.