Corona Latest Update in Marathi News SAAM TV
देश विदेश

Corona Update: नागरिकांनो काळजी घ्या! गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या ११ हजार पार, २८ जणांचा मृत्यू

Corona latest Update: भारतात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळाली होती. आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली.

Vishal Gangurde

Corona News: भारतात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळाली होती. आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात दिवसभरात ११ हजारांहून अधिक रुग्ण रुग्ण आढळले आहेत. तर गुरुवारी रुग्णांची संख्या १२ हजारांहून अधिक होती. (Latest Marathi News)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सकाळी कोरोनाच्या (Corona) सक्रिय रुग्णांमध्ये घट पाहायला मिळाली. देशात सक्रिय रुग्णांची संख्या ६६ हजार १७० इतकी झाली आहे. या सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ११,६९२ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत ४.४८ कोटी रुग्णांची नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार, शुक्रवारी २८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आतापर्यंत ५,३१,२५८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये (Keral) मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. केरळमध्ये आज ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी ४० जणांचा मृत्यू कोरनामुळे झाला होता. रुग्ण बरे होण्याच्या आकड्यात भर पडत आहे.

आतापर्यंत ४,४२,७२,२६५ जण कोरोनातून बरे झाले आहेत. मृत्यूदर १.१८ टक्के झाला आहे. तर कोरोनातून बरे होण्याचा दर ९८.६७ टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत देशात २२०.६६ कोटी जणांनी लसीकरण केले आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडवर

राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Corona New Varient) एन्ट्री केली आहे. या व्हेरिएंटचा सामाना करण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी राज्यभरातील सर्व सरकारी महाविद्यालयाचे डीन आणि आयुक्तांची बैठक पार पडली.

गिरीश महाजन यांनी या बैठकीनंतर सांगितले की, 'बैठकीमध्ये कोरोनाबाबत विशेष चर्चा झाली. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला आहे. आता मृत्यू दर फार नाही. जे मृत्यू झाले ते दुसऱ्या आजाराने झालेत. राज्यातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मास्क सक्तीचा केलेला आहे. 90 टक्के लोकांनी लस घेतली म्हणून कोरोनाचा प्रभाव जाणवत नाही' तसंच, 'घाबरु नका. पण काळजी घ्या. ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लस घ्या.', असे आवाहन गिरीश महाजन यांनी राज्यातील जनतेला केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Shukraditya Rajyog: 365 दिवसांनंतर गुरुच्या राशीत बनणार शुक्रादित्य योग; 'या' राशींच्या घरी सोनपावलांनी लक्ष्मी येणार घरी

RBI Repo Rate: होम लोन आणखी स्वस्त होणार; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

SCROLL FOR NEXT