Agnipath Scheme Protests News Updates 
देश विदेश

Agnipath Scheme Protests: अग्निपथविरोधात भारत बंद; इंटरनेट बंद, ट्रॅफिक जाम; रेल्वेही अडवल्या

आंदोलकांनी रास्तारोको केल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्या आहेत. शिवाय काही ठिकाण इंटरनेटसेवा देखील बंद करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' या लष्कर भरती योजनेला देशभरातून तीव्र विरोध होत आहे. या योजनेच्या विरोधात काही संघटनांकडून आज सोमवारी देशभर 'भारत बंद' (Bharat Bandh) आंदोलन करण्यात आलं आहे. या भारत बंदचा परिणाम देशभर पहायला मिळत आहे. आंदोलकांनी काही ठिकाणी रेल्वे गाड्या अडवल्या आहेत, तर काही ठिकाणी रास्तारोको केल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्या आहेत. शिवाय आंदोलनामुळे काही ठिकाणची इंटरनेटसेवा (Internet) प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. (Agnipath Scheme Protests News Updates)

आज भारत बंदची घोषणा काही संघटनांकडून होताच सरकारही सतर्क झाले असून. सरकारकडून रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अग्निपथ (Agneepath) योजनेवरून झालेल्या आंदोलनामुळे जवळपास १८१ मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून ३४८ पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितलं आहे.

तसंच ४ मेल एक्सप्रेस आणि ६ पॅसेंजर गाड्या देखील काही प्रमाणात रद्द करण्यात आल्या आहेत. तर राजधानी दिल्लीतील शिवाजी पुलावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या योजनेच्या निषेधार्थ रेल्वे अडवली होती. काँग्रेसकडून (Congress) रोखण्यात आलेल्या रेल्वेचा व्हिडीओ (Video) देखील आता व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ -

काँग्रेसकडून रेल्वे अडविण्यात आली असली तरी, रेल्वेच्या (Railway) मालमत्तेची सुरक्षा आणि जनतेच्या सुरक्षेसाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असून यासाठी सुरक्षा दल सतर्क असल्याचं माहिती दिल्लीचे आरपीएफ सुरक्षा आयुक्त ए.पी. जोशीया यांनी सांगितलं आहे. तसंच आम्ही रेल्वेची मालमत्तेच रक्षण करण्यात यशस्वी झालो असल्याचंही जोशिया म्हणाले आहेत.

दरम्यान, आजच्या या भारत बंदची मोठी झळ दिल्ली-नोएडाच्या (Delhi-Noida) सीमेवर बसली आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात केलेल्या भारत बंदमुळे चिल्ला बॉर्डरवरील नोएडा-दिल्ली लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कोंडी झाली असून गाड्यांच्या लांबचलांब रागा लागल्या आहेत. तर तिकडे बिहारच्या २० जिल्ह्यांमध्ये (Bihar) इंटरनेट सेवा बंद (Internet Service Off) करण्यात आली आहे. शिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आजचा जनता दरबारही रद्द केला आहे. अग्निपथ योजनेला सर्वात मोठा विरोध बिहारमध्येच झाला आहे.

तसचं काल रविवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने ३५ WhatsApp ग्रुपवर बंदी घातली असून या ग्रुपवरुन अग्निपथ योजनेबाबत खोट्या बातम्या शेअर करण्यात आल्या होत्या. असा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, हिंसा न करता शांततेने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना काँग्रेसचा पाठिंबा असेल असं प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी म्हटलं आहे. एकीकडे अग्निपथ योजनेला तीव्र विरोध होत असताना भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा (J.P. Nadda) यांनी आपण देशभरात अग्निपथ योजनेचा प्रचार करणार असल्याचं सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT