Delhi India Aghadi Protest Against Gyanesh Kumar Saam Tv
देश विदेश

India Bloc Rally: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार, दिल्लीत आज महामोर्चा; रामलीला मैदानाला छावणीचे स्वरूप, १०००० पोलिस तैनात

Delhi India Aghadi Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली होणार आहे.

Priya More
  • दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचे आंदोलन

  • इंडिया आघाडीच्या सभेमुळे दिल्लीतील वाहतुकीत मोठे बदल

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. इंडिया आघाडीने दिल्लीत महामोर्चा काढला आहे. इंडिया आघाडीची रामलीला मैदानावर सभा होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये ही महारॅली होणार आहे. या महारॅलीमुळे दिल्लीत कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रामलीला मैदानावर १० हजारांपेक्षा अधिक पोलिस, सुरक्षा दलांसह केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांना तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण रामलीला मैदाना १४ विभागांमध्ये विभागले जाणार असून त्यावर पोलिस निगराणी ठेवणार आहेत. रामलीला मैदानावर २०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. ड्रोन आणि बॉडी कॅमेऱ्यांद्वारे देखील नजर ठेवली जाणार आहे. मैदानावर एक नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.

रामलीला मैदानावर होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेला १० लाखांपेक्षा अधिक जण उपस्थित राहतील असा दावा इंडिया आघाडी करत आहे. तर दिल्ली पोलिसांकडे असलेल्या गुप्त माहितीनुसार फक्त ७०,००० जण या सभेला उपस्थित राहतील. दिल्ली पोलिस आयुक्त अनुराग कुमार आणि कायदा व सुव्यवस्था विशेष पोलिस आयुक्त देवेश चंद्र श्रीवास्तव हे दोघे सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी शनिवारी दुपारी रामलीला मैदानावर आले होते.

दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण रामलीला मैदानावर करण्यात आलेल्या तयारीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. पोलिस आयुक्तांनी संशयित व्यक्ती आणि त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. गर्दीत कोणताही गोंधळ किंवा सुरक्षेतील त्रुटी टाळण्यासाठी एन्ट्री आणि एक्झिट गेटवरे विशेष दक्षता ठेवण्यात यावी असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीने आयोजित केलेल्या महारॅलीमुळे दिल्लीतील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. दिल्ली वाहतूक पोलिसांनी मध्य दिल्लीसाठी विशेष वाहतूक सूचना जारी केली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे. आवश्यक असल्यास पर्यायी मार्गांची अंमलबजावणी केली जाईल. दिल्लीतील १० मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी पर्यायी मार्ग देखील सांगितले आहेत.

वाहतूक पोलिसांनी दिल्लीतील नेताजी सुभाष मार्ग टी-पॉइंट, राजघाट, दिल्ली गेट, आयटीओ ए-पॉइंट, अजमेरी गेट रेड लाईट, बाराखंबा रोडवरील रणजित सिंग फ्लायओव्हर, भवभूती मार्ग-डीडीयू मार्ग रेड लाईट, झंडेवालन गोलचक्कर, तुर्कमान गेट आणि मिरदर्द चौक या १० मार्गांवरील वाहतुकीत बदल केला आहे. तर बहादूर शाह जफर मार्ग, जवाहरलाल नेहरू मार्ग, अरुणा असफ अली रोड, मिंटो रोड, डीबीजी रोड आणि बाराखंबा रोडवरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कमला मार्केट गोलचक्कर आणि हमदर्द चौकाच्या आसपासही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Problems: काही लोक अंथरुणात पडताच गाढ झोपतात, पण काहींना झोपच लागत नाही, कारण...?

CNG Rates Today : सर्वसामान्यांना महागाईचा फटका! CNG च्या दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार? वाचा

Maharashtra News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते १५ नोव्हेंबरला 'पुणे रन फॉर युनिटी २०२६'चा फ्लॅग ऑफ

Mumble In Sleep : तुम्हीही झोपेत बडबडता का? शरीर देतंय 'या' गंभीर आजाराचा संकेत, वेळीच ओळखा

Black Coffee on Empty Stomach: रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यावी का? सुरक्षित की अॅसिडिटीचा धोका, वाचा

SCROLL FOR NEXT