शहरातील सार्वजनिक जागांवर वाढत चाललेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात पुणे महानगरपालिकेने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. सलग चौथ्या दिवशीही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहराच्या विविध परिसरांत धडक मोहीम राबवण्यात आली.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली दुकाने, हातगाड्या तसेच इतर बांधकामांवर कारवाई केली जात आहे. या मोहिमेचा फटका आता पुण्यातील प्रसिद्ध खाद्यसंस्कृतीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील खाऊ गल्लीला बसला आहे.
या परिसरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई करत हटवण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये हालचाल पाहायला मिळाली. शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करणे आणि सार्वजनिक जागांचा वापर सुरळीत करणे हा या मोहिमेमागील उद्देश असल्याचे मानले जात आहे. आगामी काळातही शहरातील इतर भागांत ही मोहीम सुरू राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.