kitchen Tips : मिक्सर वापरताना या 5 चुका अजिबात करू नका, होऊ शकतो मोठा अपघात

Mixer grinder safety : स्वयंपाकघरातील कामं झटपट आणि सोपी करण्यासाठी मिक्सर हा आपल्या रोजच्या वापरातील अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. पण घाईगडबडीत मिक्सर वापरताना छोटीशी चूकही मोठा अपघात होण्यास कारणीभूत ठरू शकते.
STOP MAKING THESE 5 DANGEROUS MIXER GRINDER MISTAKES
STOP MAKING THESE 5 DANGEROUS MIXER GRINDER MISTAKESsaam tv
Published On: 

स्वयंपाकघरातील कामे सोपी आणि जलद करण्यासाठी अनेकजण दररोज मिक्सरचा वापर करतात. सूप, सॉस, ज्यूस, प्युरी, तयार करण्यापासून मसाले वाटण्यापर्यंत अनेक कामांसाठी ब्लेंडर उपयुक्त ठरते. मात्र, ब्लेंडर वापरताना काही छोट्या चुका केल्यास मिक्सरचे नुकसान होऊ शकते. एवढेच नाही, तर काही वेळा अपघात होऊन दुखापत होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे ब्लेंडर वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मिक्सरचे भांड वापरताना टाळा या 5 चुका

गरम पदार्थ लगेच ब्लेंड करू नका

अनेकजण गॅसवरून गरम केलेल मसाले उतरवल्यानंतर ते थेट ब्लेंडरमध्ये टाकून फिरवतात. मात्र, ही सवय धोकादायक ठरू शकते. गरम पदार्थांमधून निघणाऱ्या वाफेमुळे मिक्सरच्या भांड्यात बंद भांड्यात दाब निर्माण होतो. त्यामुळे त्याचे झाकण अचानक उघडून गरम पदार्थ अंगावर उडू शकतात. यामुळे त्वचा भाजण्याचा धोका असतो. त्यामुळे गरम पदार्थ थोडे थंड होऊ द्यावेत आणि वाफ बाहेर पडण्यासाठी योग्य व्यवस्था करावी.

STOP MAKING THESE 5 DANGEROUS MIXER GRINDER MISTAKES
Train Facts : रेल्वेच्या ट्रेन क्रमांकात दडलाय खास कोड! प्रत्येक अंक सांगतो गाडीची माहिती

ब्लेंडरचे भांडे काठोकाठ भरू नका

मिक्सरच्या भांड्यात पदार्थ वाटताना भांडे पूर्णपणे भरू नये. भांड्यात आवश्यक तेवढीच सामग्री टाकावी. भांडे जास्त भरल्यास ब्लेंडर सुरू केल्यानंतर पदार्थ बाहेर उडू शकतात. काही वेळा दाबामुळे झाकणही उघडू शकते. त्यामुळे स्वयंपाकघरात अस्वच्छता पसरण्याची शक्यता असते. म्हणून भांड्यावर दिलेल्या कमाल मर्यादेचे पालन करावे.

पदार्थ ब्लेंड करण्याचा योग्य क्रम पाळा

मिक्सरच्या भांड्यात कोणताही पदार्थ कोणत्याही क्रमाने टाकणे योग्य नाही. पदार्थांच्या योग्य क्रमाकडे दुर्लक्ष केल्यास मोठे तुकडे ब्लेडमध्ये अडकू शकतात. त्यामुळे ब्लेंडर व्यवस्थित काम करत नाही. तसेच ब्लेडमध्ये अडकलेले पदार्थ काढणेही कठीण होऊ शकते. त्यामुळे ब्लेंडरच्या सूचनांनुसार पदार्थ योग्य क्रमाने टाकावेत.

STOP MAKING THESE 5 DANGEROUS MIXER GRINDER MISTAKES
Health Tips : भूक नसतानाही सारखं काहीतरी खावंसं वाटतंय? या क्रेव्हिंग्स मागचं कारण जाणून घ्या

आवश्यकतेपेक्षा कमी द्रवपदार्थ वापरू नका

सुका मेवा, कॉफीचे दाणे किंवा बिया यांसारखे पदार्थ ब्लेंड करताना योग्य प्रमाणात द्रवपदार्थ वापरणे आवश्यक असते. काही पदार्थांना पाण्याची आवश्यकता असते. पुरेसे द्रवपदार्थ नसल्यास ब्लेंडरचे ब्लेड व्यवस्थित फिरत नाहीत. त्यामुळे मशीन बिघडू शकते किंवा पदार्थ अपेक्षेप्रमाणे बारीक होत नाहीत.

ब्लेंडर थेट जास्त वेगाने सुरू करू नका

मिक्सर सुरू करताना सुरुवातीलाच सर्वाधिक वेग निवडणे टाळावे. कमी वेगाने सुरुवात करून आवश्यकतेनुसार हळूहळू वेग वाढवावा. यामुळे पदार्थ व्यवस्थित मिसळण्यास मदत होते आणि मशीनवर अचानक ताण येण्याची शक्यता कमी होते.

मिक्सर सुरक्षितपणे वापरण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

  • गरम पदार्थ ब्लेंड करताना वाफ बाहेर पडण्यासाठी योग्य व्यवस्था ठेवा.

  • मशीनमध्ये दिलेली सेंटर कॅप किंवा व्हेंटची सुविधा असल्यास सूचनांनुसार तिचा वापर करा.

  • मिक्सरचे भांडे क्षमतेपेक्षा जास्त भरू नका.

  • मिक्सर सुरू करताना कमी वेगाचा वापर करा.

  • ब्लेडमध्ये पदार्थ अडकले असल्यास मशीन बंद करूनच ते काढा.

  • मिक्सर वापरण्यापूर्वी त्याच्या मॅन्युअलमधील सूचना काळजीपूर्वक वाचा.

मिक्सर वापरताना योग्य पद्धती आणि आवश्यक खबरदारी घेतल्यास मशीनचे आयुष्य वाढण्यास मदत होते. तसेच स्वयंपाकघरातील संभाव्य अपघातही टाळता येतात. त्यामुळे रोजच्या वापरात या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.