INDIA Alliance 
देश विदेश

इंडिया आघाडीच्या बैठकीत २५ पक्षांचे नेते; 'या' ५ मुद्द्यांवर झाले एकमत, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची एकमुखाने मागणी

INDIA Alliance Meeting : दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत 25 पक्षांचे नेते सहभागी झाले. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्नांवर एकमत केले.

Namdeo Kumbhar

INDIA Alliance Meeting Latest News : राजधानी दिल्लीमध्ये आज विरोधीपक्षाची एकजूट पाहायला मिळाली. इंडिया आघाडीच्या बैठकीला २५ पक्षांचे नेते उपस्थित राहिल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली. एआयडीएमके आणि आप या दोन पक्षांनी इंडिया आघाडीकडे पाठ फिरवली. या बैठकीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, अखिलेश यादव, ममता बनर्जी, उद्धव ठाकरे यांच्यासह २५ पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत ५ मुद्द्यांवर विरोधकांचे एकमत झालेय. पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वांनी एकमुखाने केली. बैठकीनंतर खर्गे यांनी सर्व मुद्दे प्रसारमाध्यमांना सांगितले.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, हे खर्गे यांनी सांगितले. ५ मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्लान विरोधकांनी केलाय.

१. एसआयआरच्या मुद्द्यावर सरन्यायाधीशांना पत्र लिहिले जाईल.

२. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.

३. आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी.

४. आघाडीची बैठक दर दोन महिन्यांनी होते, पुढील बैठक हैदराबाद येथे होणार आहे.

५. संसदेच्या अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्षनेत्यांच्या अध्यक्षतेखाली दररोज बैठक होईल.

इंडिया (INDIA) आघाडीची बैठक संपली असून या बैठकीला २५ पक्षांचे नेते हजर होते. सर्वांनी आपली मते मांडली आणि त्यानंतर ५ मुद्द्यांवर एकमत झाले. एकत्र येऊन या मुद्द्यांवर एकत्र लढू, त्यावर काम करू आणि पुढे जाऊ, असे खर्गे म्हणाले.

निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी, मतांची लूट आणि निवडणुकांमध्ये होणारी चोरी याविषयी भारताच्या सरन्यायाधीशांना (Chief Justice of India) एक पत्र पाठवण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे. हे पत्र लवकरच सरन्यायाधीशांकडे सुपूर्द केले जाईल. त्याशिवाया देशाच्या शिक्षणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्व पक्षांनी एकमुखाने केली आहे. कारण नीट (NEET) आणि सीबीएसई (CBSE) परीक्षा देणाऱ्या लाखो तरुणांच्या भविष्याशी आणि विश्वासाशी जो खेळ झाला, त्याला शिक्षणमंत्रीच जबाबदार आहेत, असे हल्लाबोल खर्गे यांनी केला.

देशातील ढासळती आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जनतेशी जोडलेल्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक (All-party meeting) बोलवावी, अशी मागणी यावेळी इंडिया आघाडीने केली. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष यापुढे केवळ निवडणुकांसाठी नाही, तर दर दोन महिन्यांनी नियमितपणे एकत्र भेटत राहतील, यावर सर्वांचे एकमत झाले आहे. आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व पक्षांमध्ये ताळमेळ (Coordination) राहावा, यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात रोज सकाळी बैठक घेतली जाईल, असेही खर्गे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये वादळी वारा पावसाने डाळिंब बागेला फटका

IND vs AFG: १ डाव आणि ३०० रन्स! अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर

शक्तिपीठ महामार्गावरून राजकारण तापलं; समर्थक-विरोधक आमने-सामने; कोल्हापूरात मोठा गोंधळ

मार्कशीटच नाही, लिव्हिंगही नाही! मराठी शाळेतील नववी, दहावीचे वर्ग बंद; ६० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

१२ महिने ३६५ दिवस फिरण्यासाठी भारी आहेत कोकणातील 'ही' ५ ठिकाणे! आयुष्यात एकदा तरी नक्की जा

SCROLL FOR NEXT