Rahul Gandhi Vs Mamata Banerjee Saam Tv
देश विदेश

Explainer: ममता-अखिलेश India आघाडीचे साथीदार तरीही राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे अस्वस्थ का? काय आहे कारण?

Bharat Jadhav

Rahul Gandhi Vs Mamata Banerjee :

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकाराला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) ची स्थापना केली. परंतु या इंडिया आघाडीत काहीतरी गडबड झाल्याचं दिसत आहेत. त्यात काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेबाबत इंडिया आघाडीत नवा गोंधळ सुरू झालाय. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीसोबत राहणार म्हटल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याला कोणतीही सूट दिली नाही. त्याचवेळी अधीर रंजन चौधरी यांनी आरोप केला की, पश्चिम बंगालमधील यात्रेला आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागला.

काय म्हणाले अखिलेश यादव

बिहारमध्ये निथीस कुमार परत एकदा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. त्यापूर्वी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या प्रवेशापूर्वी जेडीयू प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूर्णिया रॅलीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण नाकारलं होते. आता उत्तर प्रदेशमध्ये भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगत इंडिया आघाडीचा दुसरा मित्रपक्ष समाजवादी पक्षाने न्याय यात्रेविषयी वेगळं विधान केलं आहे. अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु आम्हाला निमंत्रणे मिळत नसल्याचं सपाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणालेत. यामुळे अखिलेश यादव यांनाही राहुल गांधींच्या यात्रेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

काय आहे कारण

काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेससारख्या घटक पक्षांनी जागा वाटपावरून काँग्रेसवर टीका केली होती. TMC सुप्रीमो ममता बॅनर्जींनी लोकसभा निवडणुकीत जागावाटप आणि भारत जोडो न्याय यात्रेवरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींच्या यात्रा गेली तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या यात्रेपासून दूर राहिल्या होत्या. यानंतर अखिलेश यादव हे देखील या यात्रेपासून ४ हात दूर राहताना दिसत आहेत. राहुल गांधींच्या यात्रेमुळे अखिलेश आणि ममता अस्वस्थ का झाले आहेत, त्या मागे काय कारण आहे हे जाणून घेऊ..

ममता बॅनर्जींना आहे मते विभाजनाची चिंता

जेव्हा TMC प्रमुख ममता यांनी लोकसभा निवडणूक एकट्याने लढवण्याची घोषणा केली. तेव्हापासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील राजकीय वाद शिगेला पोहोचले आहेत. तेव्हापासून पश्चिम बंगालमधील काँग्रेस राज्यातील मुस्लिम मतांवर नजर ठेवून असून त्यांना आकर्षित करत आहे. अयोध्ये प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम होत असताना कोलकात्यातील मुस्लिमबहुल पार्क सर्कस परिसरात टीएमसीने सर्वधर्मीय रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीला संबोधित करताना ममता यांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले.

विविध कल्याणकारी योजनांतर्गत निधी थांबवल्याबद्दल केंद्राच्या निषेधार्थ शुक्रवारी आयोजित एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी काँग्रेसला ३०० जागांवर लढण्यास सांगितले आणि बाकीच्या जागा इंडिया आघाडीला द्या असं सांगितले. पण त्याला काँग्रेस सहमत नाही. आता तो राज्यातील मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसची यात्रा होत असल्याचं त्या म्हणाल्या. इतकेच नाही तर काँग्रेस ४० जागाही जिंकेल का नाही हे सांगता येत नसल्याचा टोला त्यांनी लगावला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत टीएमसी काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे जाहीर केलं. यावरून ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावरून टीएमसीला अल्पसंख्याक मतांचे विभाजन नको असल्याचं म्हटलं जात आहे.

२२ जानेवारी रोजी टीएमसीच्या सर्व रॅलीमध्ये, ममता यांनी मुस्लिम मतदारांना टीएमसीलाच मतदान करा. दुसऱ्या पक्षाला मतदान करुन मते वाया घालू नका असं आवाहन केलं होतं. २०११ मध्ये सत्तेवर आल्यानंतर TMCसरकारने इमामांसाठी भत्ते, मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, कल्याणकारी मंडळांची निर्मिती आणि सरकारी मान्यताप्राप्त मदरशांसाठी ५० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करून अल्पसंख्याकांना आपल्याकडे आकर्षित केली आहेत.

दरम्यान मुस्लीम मतदारांनी २०१८ आणि २०२३ च्या पंचायत निवडणुका आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला पूर्ण पाठिंबा दिला होता. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत हे स्पष्ट झाले होतं. कारण या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि डाव्या आघाडीला २९४ विधानसभा जागांपैकी एकही जागा जिंकता आली नव्हती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT