INDIAN AIRLINES CRISIS: FUEL PRICE SURGE MAY FORCE FLIGHT SHUTDOWNS Saam Tv
देश विदेश

Fuel Price Hike : देशात विमान सेवा बंद होणार? एअरलाईन्स अडचणीत, एअर इंडियाचे थेट सरकारला पत्र; जाणून घ्या कारण

India Airline Fuel Price Rise News : एटीएफ इंधन दरवाढीमुळे भारतीय विमान कंपन्या संकटात. कर कपात न झाल्यास उड्डाणे बंद होण्याचा इशारा; तिकीट दरात २०-३०% वाढीची शक्यता.

Alisha Khedekar

  • एटीएफ दरवाढीमुळे विमान कंपन्यांवर आर्थिक ताण

  • इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेटचा सरकारला इशारा

  • तिकीट दरात २०-३०% वाढीची शक्यता

  • कर कपात आणि आर्थिक मदतीची मागणी

  • विमानसेवा विस्कळीत होण्याचा धोका

आखाती देशांत गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या युद्धाचा फटका इंधनाला बसला आहे. अशातच भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील प्रमुख विमान कंपन्या इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट यांनी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या वाढत्या किमतीमुळे व्यवसाय चालवणे कठीण होत असल्याचे स्पष्ट केले आहे. जर सरकारने इंधनावरील करात कपात केली नाही किंवा आर्थिक मदत दिली नाही, तर काही कंपन्यांना आपले कामकाज थांबवावे लागू शकते, परिणामी विमानसेवा बंद होऊ शकते असा इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्स (FIA) ने केंद्र सरकारकडे याबाबत निवेदन सादर केले आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, इंधन दरातील सातत्याने होत असलेली वाढ विमान कंपन्यांच्या खर्चात मोठी भर घालत आहे. सध्याच्या परिस्थितीत कंपन्यांचे ऑपरेशन टिकवणे अवघड होत चालले आहे.

उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, विमान कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी तब्बल ४० ते ४५ टक्के हिस्सा हा केवळ इंधनावर खर्च होतो. गेल्या काही महिन्यांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने एटीएफच्या दरात मोठी उसळी आली आहे. भारतात यावर केंद्र व राज्य सरकारांकडून आकारले जाणारे कर, जसे की व्हॅट आणि उत्पादन शुल्क, हे इतर देशांच्या तुलनेत अधिक आहेत. त्यामुळे कंपन्यांचे नफा मार्जिन जवळपास नाहीसे होत आले आहे.

या पार्श्वभूमीवर एफआयएने सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. एटीएफला जीएसटीच्या कक्षेत आणल्यास कराचा बोजा कमी होईल, अशी त्यांची भूमिका आहे. याशिवाय, विमानतळांवरील लँडिंग आणि पार्किंग शुल्कात तात्पुरती कपात करण्याची मागणीही करण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर सावरत असलेल्या या क्षेत्राला स्थिरतेसाठी विशेष कर्जसुविधा किंवा आर्थिक पॅकेज देण्याचीही गरज व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, वाढत्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी विमान कंपन्यांकडे तिकीट दर वाढवण्याचा पर्याय उरला आहे. आगामी सुट्ट्यांच्या हंगामात विमान प्रवासाच्या तिकिटांमध्ये २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर ताण पडणार असून, हवाई प्रवास महाग होण्याची चिन्हे दिसत आहेत. जर लवकरच योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर देशातील विमान सेवा आणि कनेक्टिव्हिटीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा उद्योगाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT