Petrol Pump India X
देश विदेश

घाबरून, गोंधळून जाऊ नका! देशात पुरेसा पेट्रोल-डीझेल साठा; पंपांवरील गर्दीनंतर इंडियन ऑइलचं स्पष्टीकरण

Ind Pak Tension : भारत-पाकिस्तान तणाव वाढल्यानंतर इंधन उपलब्ध नसल्याने पेट्रोल पंपाबाहेर रांगा लागल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर काहीजण पसरवत होते. या अफवांवर स्पष्टीकरण देताना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने एक्स पोस्ट शेअर केली आहे.

Yash Shirke

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढले आहेत. काल (८ मे) रात्रीच्या सुमारास पाकिस्तानने भारतातील नागरी वस्तीच्या भागात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. भारताने या भ्याड हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या तिन्हीही दलांनी पाकिस्तानचा डाव हाणून पाडला. याच दरम्यान पेट्रोल पंपांबाहेर लांब रांगा लागल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. यावर IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने निवेदन जारी केले आहे. नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. प्रत्येक आउटलेटवर एलपीजी आणि तेलाचा पुरेसा पुरवठा उपलब्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

'इंडियन ऑइलकडे देशभरात तेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा आहे. सप्लाय लाईन व्यवस्थितपणे सुरु आहे. तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. घाबरुन इंधन खरेदी करण्यासाठी गर्दी करण्याची गरज नाही. सर्व आउटलेट्सवर तेल आणि गॅस सहज उपलब्ध होतील', अशी एक्स पोस्ट इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने केली आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. इंधनाचा पुरेसा साठा नसल्याने पेट्रोल पंपावर लोकांनी गर्दी केल्याचे खोटे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते. गुरुवारी (८ मे) रात्री पाकिस्तानने भारतावर मिसाईल आणि ड्रोनने हल्ले केले होते. या धर्तीवर काहीजण खोटी माहिती पसरवत असल्याचे समोर आले होते.

काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरने घेतला. भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. त्यानंतर काल पाकिस्तानने शस्त्रसंधींचे उल्लंघन करत भारतातील काही ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न भारतीय सेनेने हाणून पाडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stock market today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात कोसळला! सेन्सेक्स-निफ्टी धडाम्, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT