Income Tax Raid On Congress MP Saam Digital
देश विदेश

Income Tax Raid: ३५१ कोटींची कॅश सापडली, आता 'कुबेराचा खजिना' शोधणार; आयकर विभाग काँग्रेस खासदाराचं घर खोदणार

Sandeep Gawade

Income Tax Raid On Congress MP

झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल ३५१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. चार पाच दिवस या रकमेची मोजदाद सुरू होती. इतकी मोठी रक्कम सापडल्यानंतरही धीरज साहू यांनी मोठा खजिना लपवल्याचा आयकर विभागाला संशय आहे. त्यामुळे रांचीच्या रेडियम रोडवर असलेल्या धीरज साहू यांच्या घरात आयकर विभागाचे पथक खोदकाम करण्याच्या तयारीत आहे.

रोकड जप्त केल्यानंतर घरात खजिना लपवल्याचा संशय आहे, त्यामुळे आयकर विभागाकडून त्यादृष्टीने धीरज साहू यांची चौकशी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जमिनीखाली सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंचा शोध घेतला जात आहे. जिओ सर्व्हिलन्स सिस्टिम मशीनद्वारे घराची झडती सुरू आहे. आयकर विभागाने धिरज साहू यांच्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर धक्कादायक चित्र समोर आले होते. नोटांचे घबाड सापडले होते. रोख रक्कम इतकी होती की, नोटा मोजण्याचे यंत्रही बिघडल्याची माहिती होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

करचुकवेगिरी प्रकरणी बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडच आणि प्रवर्तकांवर आयकर विभागाने ६ डिसेंबर रोजी छापा टाकला होता. तब्बल ८० अधिकाऱ्यांच्या ९ टीमने ही कारवाई सुरू केली होती. त्यानंतर २०० कर्मचाऱ्यांची टीम दाखल झाल्यानंतर कॅशने भरलेल्या १७६ बॅगा सापडल्या होत्या. धीरज साहू यांच्या कुटुंबीय दारूचा व्यवसायात गुंतले आहेत. दरम्यान त्याच्या घरी मोठी रोकड सापडल्यानंतर कॉंग्रेसने मात्र साहू यांच्या व्यवसायाशी कॉग्रेस पक्षाचा कोणताही संबध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT