महादेव बुक ऑनलाईन बेटिंग प्रकरणी महादेव बुकचा मालक रवी उप्पलला दुबईतून अटक करण्यात आली आहे. उप्पल विरोधात बजावण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारावर दुबई पोलिसांनी ही अटक केली आहे. रवी उप्पलला लवकरच भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे.
६००० कोटी रुपयांच्या मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी ईडी तपास करत आहे. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर देखील या प्रकरणात आरोप झाले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रवी उप्पल महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपच्या दोन मुख्य मालकांपैकी एक आहे. ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलने रवीविरोधात रेड नोटीस जारी केली होती. त्या आधारे दुबई पोलिसांनी रवीला ताब्यात घेतले आहे.
रवी उप्पलचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी दुबईच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. ईडी व्यतिरिक्त छत्तीसगड पोलीस तसेच मुंबई पोलीस देखील उप्पलविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करत आहेत. (Latest News Update)
कथित बेकायदेशीर सट्टेबाजीशी संबंधित या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ऑक्टोबरमध्ये छत्तीसगडच्या रायपूरमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा नोंदवला होता. उप्पल आणि दुसरा मालक सौरभ चंद्राकर यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.